प्रज्ञा म्हात्रे, ठाणेपाडवा म्हटले की गुढ्या-तोरणे, रांगोळ््या, शोभायात्रांसोबतच परंपरा जपणारा पदार्थ हमखास येतो तो म्हणजे श्रीखंड. हल्ली वर्षभर विविध स्वादांचे श्रीखंड उपलब्ध असले तरी पाडव्याचा गोडवा वाढवणाऱ्या श्रीखंडाची हमखास खरेदी मराठी घरांत होतेच. यंदाही पाडव्यानिमित्त फक्त ठाण्यात तब्बल १५०० टन श्रीखंड फस्त होणार असल्याची माहिती वेगवेगळ््या दुकानदारांनी ‘लोकमत’ला दिली. गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंडांची मागणी नोंदवण्यासाठी आतापासूनच दुकानांचे फोन घणघणू लागले आहेत. राज्यातील-परराज्यातील वेगवेगळ््या कंपन्यांचे श्रीखंडांचे ब्रँड जसे लोकप्रीय आहेत, तशीच त्या त्या शहरातील मिठाईच्या, खाद्यसंस्कृतीवर स्वत:चा ठसा उमटविणााऱ्या मराठमोळ््या परंपरा जपणाऱ्या दुकानांना या काळात विशेष पसंती दिली जाते. नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्या केशर, आम्रखंड या चवींप्रमाणेच केशर ड्रायफ्रुट, वेलची, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, फ्रेशफ्रुट अशा विविध चवींचे श्रीखंड बाजारात उपलब्ध आहे. शिवाय घरगुती श्रीखंडासाठी मलईयुक्त चक्क्यालाही मागणी आहे.श्रीखंड हा गोडपदार्थ असतो. परंतु सध्याच्या फ्युजनच्या जमान्यात तिखट श्रीखंडही तितकेच लोकप्रीय आहे. मिरचीचे तिखट श्रीखंड तेही हिरव्या रंगातील यंदाच्या पाडव्याची चव खुलवणार आहे. हे श्रीखंड ग्राहकांसाठी गुरूवारपासून उपलब्ध असेल, असे दुकानदारांनी सांगितले.सध्या २४० ते ४०० रुपये किलोदरम्यान श्रीखंडाची किंमत असून गेल्यावर्षीपेक्षा यंदाचे दर २० ते ४० रुपयांनी वधारले आहेत. नेहमीच्या पसंतीच्या काही दुकानांतून ९०० किलो, तर काही ठिकाणांहून एक हजार किलो; तर काही ठिकाणांहून चक्क पाच हजार किलो श्रीखंडाची खरेदी होणार आहे.
ठाण्यात फस्त होणार १५०० टन श्रीखंड
By admin | Updated: April 6, 2016 04:12 IST