शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

गुगलवरही दिसणार न्यूज फिड

By शेखर पाटील | Updated: July 25, 2017 16:08 IST

गुगलने आता आपल्या डेस्कटॉप आणि स्मार्टफोन आवृत्तीसाठी न्यूज फिडची सुविधा प्रदान केली असून या माध्यमातून युजरला त्याच्या आवडीशी संबंधीत कंटेंट दर्शविण्यात येणार आहे.

गुगलने आता आपल्या डेस्कटॉप आणि स्मार्टफोन आवृत्तीसाठी न्यूज फिडची सुविधा प्रदान केली असून या माध्यमातून युजरला त्याच्या आवडीशी संबंधीत कंटेंट दर्शविण्यात येणार आहे.

फेसबुक आणि ट्विटरसारख्या साईटवर न्यूज फिड लोकप्रिय आहेत. यात युजरला त्याच्या मित्रांच्या अपडेटसह त्याने फॉलो/लाईक केलेल्यांची अद्ययावत माहिती दिसत असते. या दोन्ही न्यूज फिड अतिशय गतीमान आहेत. याला आव्हान देण्यासाठी गुगलने कधीपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी गुगल नाऊ हा कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारा डिजीटल असिस्टंट सादर करण्यात आला होता. मात्र आता याऐवजी गुगलने युजरसाठी न्यूज फिड प्रदान केली आहे. अर्थात गुगल नाऊला आता गुगलच्या सर्चसह अन्य महत्वाच्या प्रॉडक्टमध्ये विलीन करण्यात आले आहे.

आपण गुगलवरून असंख्य बाबींना सर्च करत असतो. नेमक्या याच सर्च हिस्ट्रीचा वापर करून संबंधीत युजरला त्याच्याशी संबंधीत बातम्या, व्हिडीओज, म्युझिक आणि सर्व हॅपनींग्ज आता न्यूज फिडमध्ये दिसणार आहे. संगणक तसेच अँड्रॉइड व आयओएस प्रणालींचा वापर करणार्‍यांना हे फिचर देण्यात आले आहे. अर्थात आपण आधी क्रिकेटबाबत सर्च केले असल्यास आपल्याला याच्याशी संबंधीत विविध स्त्रोतांवरील माहिती देण्यात येईल. विशेष म्हणजे क्रिकेट व त्याच्याशी संबंधीत अन्य टॉपीक फॉलो करण्याची सुविधाही यात असेल. यामुळे अर्थातच आपल्या न्यूज फिडमध्ये नियमितपणे क्रिकेटचे अपडेट दर्शविण्यात येतील. गुगलवरील न्यूज फिडचा वापर हा आता प्राथमिक अवस्थेत असला तरी भविष्यात या माध्यमातून गुगल आपल्या युजर्सला सर्व अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल हे निश्‍चित. अर्थात यामुळे फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल साईटला तगडे आव्हान उभे राहणार आहे. पहिल्या टप्प्यात हे फिचर अमेरिकेतील युजर्सला सादर करण्यात आले असून येत्या काही दिवसात भारतासह अन्य देशांमधील युजर्सला ते प्रदान करण्यात येणार आहे.