शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मनातले विचार ‘ओळखून’ टाइप करणारी चिप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 09:51 IST

शरीराच्या वरील भागाला अपंगत्व आलेल्या किंवा हात नसलेल्या किंवा हाताची बोटं नसलेल्या व्यक्तिंना याच साध्या साध्या गोष्टी करायला किती कष्ट पडतात ते धडधाकट माणसांच्या लक्षात येत नाही.

कॉम्प्युटर आणि टायपिंग या आजच्या आधुनिक युगातल्या जवळजवळ जीवनावश्यक गरजा झाल्या आहेत. खरं तर अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या जोडीला स्मार्ट फोन आणि वायफाय हेही “कान्ट लिव्ह विदाऊट” या प्रकारात मोडायला लागले आहेत. आपले विचार लिहून ठेवायला, शेअर करायला, त्यावर चर्चा करायला, ऑनलाईन खरेदी करायला, वेगवेगळ्या वेबसाईट्सवर जाऊन तिथे काय लिहिलं आहे ते वाचून यायला अशा अनेक कारणांनी आपण कॉम्प्युटर वापरतो. त्यावर टाइप करतो आणि टाइप केलेला मजकूर सेंड करतो. वेगवेगळ्या लिंक्सवर क्लिक करतो. हे सगळं आपण इतकं सातत्याने आणि विनासायास करत असतो, की त्याबद्दल इतकं विस्ताराने बोलण्यासारखं काय आहे हे आपल्याला कळू शकत नाही. शरीराच्या वरील भागाला अपंगत्व आलेल्या किंवा हात नसलेल्या किंवा हाताची बोटं नसलेल्या व्यक्तिंना याच साध्या साध्या गोष्टी करायला किती कष्ट पडतात ते धडधाकट माणसांच्या लक्षात येत नाही.

अशीच एक विकलांग झालेली व्यक्ती म्हणजे ऑस्ट्रेलियात राहणारे ६२ वर्षांचे फिलिप ओ किफ. त्यांना २०१५ साली अमायॉटिक लॅटरल स्क्लेरॉसीस (ALS) नावाच्या दुर्धर आजाराचं निदान झालं. या आजाराचं जगात सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण म्हणजे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज! या आजारात हळूहळू शरीरातील स्नायू काम करायचे बंद होतात. त्याप्रमाणे फिलिप ओ किफ यांच्या शरीराच्या वरच्या भागातील स्नायू हळूहळू काम करायचे बंद झाले. आयुष्याची अनेक वर्षे धडधाकट जगल्यानंतर ज्यावेळी असं अपंगत्व येतं, त्यावेळी त्या व्यक्तीची काय अवस्था होत असेल, याबद्दल आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

हालचालींवर इतकी प्रचंड बंधनं आल्याचा थेट परिणाम हा व्यक्तीच्या सामाजिक अभिसरणात होतो. शरीर साथ देत नाही. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. मित्र आणि नातेवाईकांशी गाठीभेटी कमी होतात. म्हणजे मूळ आजार तर असतोच, पण त्याच्या जोडीला विचित्र एकटेपणादेखील येतो आणि मग अशी एकटी पडलेली माणसं मानसिक रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढते.

ज्यांना प्रत्यक्ष बाहेर पडून लोकांशी संवाद साधता येत नाही, अशी माणसं सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहू शकतात. पण जर का व्यक्तीचे हात आणि बोटं हलतच नसतील तर टाईप तरी कसं करणार? अशा व्यक्तिंना साध्या साध्या कामांसाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते. पण, आता मात्र हे चित्र वेगाने बदलेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण फिलिप ओ किफ हे मेंदूत बसवलेल्या एका सूक्ष्म चिपच्या मदतीने मनातला विचार डायरेक्ट ट्विट करणारी जगातली पहिली व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी २३ डिसेंबर २०२१ रोजी No need for keystrokes or voices. I created this tweet just by thinking it.’ #helloworldbci (बटन दाबायची किंवा आवाजाची काही गरज नाही. मी हे ट्विट केवळ त्याबद्दल विचार करून तयार केलं आहे.) असं ट्विट केलं आहे. त्याबरोबर त्यांनी #helloworldbci हा हॅशटॅग वापरला आहे. या हॅशटॅगमधील शेवटची bci ही तीन अक्षरं  ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस यासाठीची आहेत.

ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस म्हणजे कॅलिफोर्नियातील सिन्क्रॉन नावाच्या न्यूरोव्हास्क्युलर बायोइलेकट्रोनिक्स औषधं बनवणाऱ्या कंपनीने बनवलेली एक कागदाएवढी पातळ चिप. फिलिप  किफ यांच्या मेंदूत ही सूक्ष्म चिप बसवलेली आहे. तिचा छोट्या डबीएवढा ट्रान्समीटर त्यांच्या छातीवर चिकटपट्टीच्या साहाय्याने बसवलेला आहे. ही चिप त्यांच्या मनात आलेले विचार वाचून त्याप्रमाणे कॉम्प्युटरला आज्ञा देते. त्यामुळेच फिलिप ओ किफ यांना स्क्रीनवर जिथे क्लिक करण्याची इच्छा असेल तिथे त्यांनी कुठलीही हालचाल न करता क्लिक केलं जातं. या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी कुठलीही हालचाल न करता ट्विट तर केलंच आहे. पण ते त्याचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग आणि बँकेचे व्यवहारदेखील करू शकतात.

फिलिप ओ किफ म्हणतात की, ‘‘मी पहिल्यांदा या प्रयोगाबद्दल वाचलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं, की यातून मला माझं हरवलेलं स्वावलंबन परत मिळू शकतं आणि बऱ्यापैकी प्रमाणात तसं झालेलंही आहे. हे तंत्रज्ञान शिकणं म्हणजे जणू काही सायकल चालवायला शिकण्यासारखं आहे. तुम्हाला ते शिकावं लागतं, त्याचा सराव करावा लागतो. पण एकदा का ते तुम्हाला वापरता आलं, की तुमचा वेग मोठ्या प्रमाणात वाढतो!’’ आजवर अनेक प्रकारच्या आजारांवर आधुनिक औषधांनी उपचार शोधले आहेत. एकेकाळी असाध्य वाटणारे रोग बरे केले आहेत. आता औषधांना तंत्रज्ञानाचीही जोड मिळते आहे. 

ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसकोणत्याही कारणाने विकलांगत्व आलेल्या व्यक्तिंसाठी हे तंत्रज्ञान म्हणजे जादूची छडी ठरेल.  शरीराची हालचाल न करताही त्यांच्या मेंदूत बसवलेली पातळ चिप त्यांचे विचार संगणकावर टाईप करू शकेल ! ऑस्ट्रेलियाचे  फिलिप ओ किफ यांच्यापासून सुरुवात झालेली आहे !

टॅग्स :technologyतंत्रज्ञान