शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

Airtel-Vi पुन्हा देणार युजर्सना झटका! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वाढू शकते रिचार्ज प्लॅन्सची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:07 IST

Airtel Price Hikes: प्रत्येक युजरकडून मिळणारा सरासरी महसूल 300 रुपयांवर नेण्याचा प्रयत्न एयरटेल करत आहे. त्यासाठी मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या जाऊ शकतात.  

Airtel पुन्हा एकदा आपल्या मोबाईल टॅरिफच्या दारांत वाढ करू शकते. कंपनीला आपला अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर (ARPU) 300 रुपये करायचा आहे, असं कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर गोपाल विठ्ठल यांनी म्हटलं आहे. हे लक्ष्य कंपनीला यावर्षी साध्य करायचे आहे, त्यामुळे पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी वोडाफोन-आयडिया देखील पुन्हा एकदा टॅरिफ प्लॅन्स वाढवणार असल्याची बातमी आली होती. 

एयरटेल येत्या तीन ते चार महिन्यात पुन्हा एकदा मोबाईल टॅरिफचे दर वाढवू शकते. ET Telecom च्या रिपोर्टनुसार, कंपनी गेल्यावर्षी नोव्हेंबर प्रमाणेच मोबाईल टॅरिफ वाढवताना कोणताही संकोच करणार नाही, असं एयरटेलचे एमडी गोपाल विठ्ठल यांनी म्हटलं आहे.  

सिम कन्सॉलिडेशनची लाट 

गेल्यावर्षी करण्यात आलेल्या भाववाढीमुळे दोनपेक्षा जास्त सिम वापरणाऱ्या युजर्सच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. सध्या 20-25 टक्के सिम कन्सॉलिडेशन झालं आहे तसेच 4G सिम कन्सॉलिडेशनचा दर देखील कमी आहे. ही सिम कन्सॉलिडेशनची लाट ओसरल्यानंतर कंपनी टॅरिफ प्लॅनमध्ये भाववाढ करेल, असं गोपाल विठ्ठल यांनीं म्हटलं आहे.  

येत्या काळात डेटाचा होणारा वापर कमी होईल असं देखील त्यांना वाटत. सध्या दर महिन्याला 17GB ते 18GB डेटा वापरला जात आहे, जो शाळा, ऑफिस ओपन झाल्यावर आणखीन कमी होऊ शकतो. त्याचा परिणाम नक्कीच कंपनीच्या महसुलावर होईल. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातील तिन्ही प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ मध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. टेलीकॉम कंपन्यांनी ARPU (अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर) वाढवण्यासाठी मोबाईल टॅरिफ वाढवले होते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :AirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया