शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून जवानाचा गोळीबार

By admin | Updated: July 20, 2014 00:42 IST

सांगोला तालुक्यातील घटना; भावकीतील महिला ठार

सांगोला : भावकीतील शेतजमिनीच्या वादातून सैन्यातील जवानाने केलेल्या गोळीबारात एक महिला जागीच ठार झाली़ जवानासह दहा जणांच्या जमावाने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात अन्य चौघे गंभीर जखमी झाले़ ही घटना शनिवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास सांगोला तालुक्यातील उदनवाडी-पांढरेवस्ती येथे घडली.उज्ज्वला जयवंत पांढरे (वय ३०) असे जवानाच्या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. दत्तात्रय तातोबा पांढरे, अर्जुन तातोबा पांढरे, जयवंत तातोबा पांढरे, कुसूम तातोबा पांढरे व सुमन अर्जुन पांढरे अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर सांगोला येथील डॉ. धनंजय गावडे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर सांगोला तालुक्यात खळबळ उडाली असून, गोळीबाराची सर्वत्र चर्चा सुरु होती. भगवान नामदेव पांढरे, काकासाो नामदेव पांढरे, विष्णू नामदेव पांढरे, नामदेव तुकाराम पांढरे, बिरू नामदेव पांढरे, कलाबाई काकासाो पांढरे, मालन नामदेव पांढरे, पूजा बिरु पांढरे, छाया भगवान पांढरे,विष्णू पांढरे यांची पत्नी व अन्य एक अशी अकरा आरोपींची नावे आहेत़ काकासाहेब व विष्णू नामदेव पांढरे, नामदेव तुकाराम पांढरे यांना ताब्यात घेतले आहे. तीन वर्षांपूर्वी नाझरे (ता. सांगोला) येथील प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांच्या मालकीची ८.२० एकर शेतजमीन अर्जुन, दत्तात्रय, भीमराव, जयवंत तातोबा पांढरे या चौघा भावांनी खरेदीखत करुन घेतली होती. तातोबा पांढरे व नामदेव पांढरे यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून वाद होता.शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास नामदेव तुकाराम पांढरे यांच्या कुटुंबातील सदस्य बंदूकआणि इतर शस्त्रांसह दाखल झाले़ प्रारंभी हवेत गोळीबार करीत दत्तात्रय पांढरे यांच्या डोक्यात बंदुकीने प्रहार केला. भगवान, काकासाो, विष्णू, नामदेव भगवान पांढरे यांचा साडूभाऊ अशा चौघांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने नामदेव तुकाराम पांढरे यास मारहाण केली.यानंतर लष्करातील जवान बिरु नामदेव पांढरे याने डबल बोअर बंदुकीने उज्ज्वला जयवंत पांढरे हिच्यावर गोळ्या झाडल्याने ती जागीच ठार झाली़-------------------------------भावकीतील भांडणाचे हिंसक पडसादअकरा आरोपींविरोधात गुन्हा दाखलतीन आरोपींना अटकबिरू पांढरे असे गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव असून, तो जम्मू-काश्मीर-श्रीनगर या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून सैन्यात ट्रेडमन म्हणून कार्यरत आहे़तो गेल्या आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता.