येथील शासकीय धान्य गोदामात तहसीलदार प्रदीप शेलार, निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे, मंडळ अधिकारी विशाल नलवडे, उदय कोंढारे यांनी हे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित केले़ यावेळी पं. स़ सभापती अनिल डिसले, उपसभापती प्रमोद वाघमोडे, जि. प. सदस्य मदन दराडे, समाधान डोईफोडे, प. स. विरोधी पक्षनेते सुंदरराव जगदाळे, सदस्य अविनाश मांजरे, उमेश बारंगुळे, केशव घोगरे आदी उपस्थित होते़
सर्वप्रथम तालुक्यात असलेल्या अनुसूचित जमातीच्या २०११ च्या लोकसंख्या टक्केवारीच्या आधारे उतरत्या क्रमाने पूर्वीच्या राखीव जागा वगळून महागाव अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित करण्यात आले़ त्यानंतर अनुसूचित जातीची टक्केवारी जास्त परंतु १९९५ पासून राखीव असलेल्या ग्रामपंचायती वगळून रातंजन, काटेगाव, शेलगाव मा, भोईंजे, चिंचोली/ढेंबरेवाडी, बेलगाव, जोतीबाची वाडी, मुंगशी आर, कव्हे, रऊळगाव, मालेगाव ही ११ गावे निश्चित करण्यात आली़ त्यातून चिठ्ठीद्वारे रातंजन, जोतिबाची वाडी, मंगशी आर, मालेगाव, व कव्हे ही पाच गावे अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आली़ याच आधारानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३५ ग्रामपंचायती आरक्षित केल्या होत्या़ त्यात लोकसंख्येची टक्केवारी आणि मागील आरक्षणाचा विचार करुन मालवंडी, वैराग, उपळे दु., जामगाव पा., फपाळवाडी/गाताचीवाडी, सौंदरे, बावी, वालवड व बाभूळगाव ही नऊ गावे निश्चित केले. येथेही लोकसंख्या टक्केवारीच्या आधारे चिठ्ठीद्वारे २६ गावे निश्चित केली. एकूण ३५ गावात पुन्हा चिठ्ठी टाकून १८ गावे महिलांसाठी तर १७ गावे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी फिक्स झाली़ १२९ मध्ये ४७ गावे ही एस. सी., एसटी, ओबीसीसाठी आरक्षित झाल्यानंतर उर्वरित ८२ गावांमधून २०१५ साली महिला आरक्षण नसलेली ३२ गावे सर्वसाधारण महिलांसाठी निश्चित केली. तर ३२ गावे सर्वसाधारण झाली़ ओबीसींच्या चिठ्ठ्या काढून सर्वसाधारणसाठी राहिलेल्या १८ गावांमध्ये चिठ्ठीद्वारे कापशी, सुर्डी, बोरगाव झा., पिंपरी ,तुळशीदासनगर, रुई, तांदुळवाडी, गौडगाव, वाणेवाडी व ममदापूर ही नऊ गावे सर्वसाधारण महिला तर उर्वरित ९ गावे सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले़
या गावानी घेतला आक्षेप
- नऊ सर्वसाधारण महिलांच्या चिठ्ठी काढताना मानेगाव, तांदुळवाडी, आदी गावातील औंदुबर मोटे, राजेंद्र गरड , १९९५ पासून दोनवेळा आमच्या गावाला महिला आरक्षण असताना आता आणखी महिला आरक्षण कसे सवाल केला. आमची गावे वगळून महिलांची चिठ्ठी काढावी अशी मागणी केली़ मात्र तहसीलदारांनी २००५ सालापूर्वी महिलांना ३३ टक्के आरक्षण होते मात्र त्यानंतर ५० टक्के आरक्षण झाल्यामुळे काही गावांमध्ये महिलांचे आरक्षण डबल पडू शकते हे सर्व आम्ही शासकीय नियमानुसार केले असल्याचे सांगितले.
ही ४१ गावे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव
पांगरी, कासारी, पांढरी, राळेरास, कासारवाडी, जामगाव आ., सर्जापूर, हत्तीज/चिंचखोपन/हिंगणी, मानेगाव, तुर्कपिंपरी, उंबरगे, साकत, रस्तापूर,इर्ले,चारे,खांडवी/गोडसेवाडी, पिंपळगाव,पान, भांडेगाव, वांगरवाडी/तावरवाडी, सावरगाव, गाडेगाव, धामणगाव आ., श्रीपतपिंपरी, आगळगाव, पुरी, मुंगशी वा., ताडसौंदणे, गुळपोळी, पिंपळवाडी, नारी/नारीवाडी, नागोबाचीवाडी/लक्ष्याचीवाडी, पिंपरी आर., कापशी, सुर्डी, बोरगाव झा., तुळशीदासनगर, रुई, तांदुळवाडी, गौडगाव, वाणेवाडी, ममदापूर ही गावे महिलांसाठी आरक्षित झाली़
ही ४१ गावे झाली सर्वसाधारण
पिंपळगाव दे., नांदणी, आळजापूर, मिर्झनपूर, बळेवाडी, धामणगाव दु., बोरगाव खू. कुसळंब, सासुरे, पाथरी, आंबेगाव, धोत्रे, चिखर्डे, पिंपरी पा.,तावडी, अलीपूर, इंदापूर, झाडी, दहिटणे, लाडोळे, भालगाव, शेंद्री, शेलगाव व्हळे, कांदलगाव, पानगाव, तडवळे,चुंब, घोळवेवाडी, उंडेगाव, अंबाबाईचीवाडी, खडकलगाव, तांबेवाडी, हळदुगे, अरणगाव, खडकोणी, संगमनेर, काळेगाव, भोयरे, मळेगाव, भातंबरे, खामगाव.
सभापतीचे गाव अनु. जाती महिलेसाठी
या आरक्षणाच्या चिठ्ठी काढताना एखादे गाव आरक्षित झाल्यानंतर त्या गावचे कार्यकर्ते हे लगेच बाहेर निघून जात असल्याचे चित्र दिसत होते़ पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले यांचे गाव असलेले व दोन वर्षांनी निवडणुका होणार असलेले जोतीबाची वाडी हे गाव अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले़
---२७बार्शी-सोडत---