शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

बंधाऱ्यात पाणी ‘मुरतंय’

By admin | Updated: November 4, 2015 23:57 IST

गुरूनाथ पेडणेकर : जलव्यवस्थापन समिती सभेत पाणलोटच्या कामांबाबत नाराजी

सिंधुदुर्गनगरी : मे महिन्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राज्य अधीक्षक कृषी विभागाकडून पाणलोट अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी घालण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचत नसल्यामुळे या सर्व बंधाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी केली. या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा करून या प्रकरणात तथ्य असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी सांगत नोव्हेंबर अखेर पाणलोटअंतर्गत सर्व बंधाऱ्यांची पहाणी करणार असल्याचे स्पष्ट केले.जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती गुरुनाथ पेडणेकर, संजय बोंबडी, स्नेहलता चोरगे, समिती सदस्य जनार्दन तेली, भारती चव्हाण, दिलीप रावराणे, सुगंधा दळवी, संजीवनी लुडबे, वासुदेव परब, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी पाणलोट अंतर्गत बांधण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे बंधारे निकृष्ट असल्याचे सांगत मे अखेरपर्यंत या बंधाऱ्यात पाणी साचत नसल्याचे सांगून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. याच विषयास अनुसरून उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी जलयुक्त शिवार अभियानाचा मुद्दा उपस्थित करत या अभियानांतर्गत शासनाचे प्रति बंधाऱ्यासाठी ७ ते ८ लाख रुपये खर्च करून हे बंधारे वैयक्तिक मालमत्तेत उभारले गेले आहेत. या बंधाऱ्यांची पाहणी करणार असल्याचे संदेश सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१२८0 बंधारे बांधून पूर्ण : जिल्हा परिषदेचे नियोजनजिल्हा परिषदेने यावर्षी १० हजार कच्चे व पक्के बंधाऱ्यांच्या उद्दिष्ट्यापैकी आजपर्यंत १२८० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. यात कच्चे ६१० बंधारे तर ६७० पक्के बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. यावर आपले मत मांडताना उपाध्यक्ष देसाई म्हणाले की, बंधारे बांधताना बहुतेक ठिकाणी रिकाम्या सिमेंट पिशव्यांमध्ये मातीने भरलेले दोनच थर लावले जातात. तसे न करता भविष्यातील पाणीटंचाईवर मात करायची असेल तर चार ते पाच थरांचा बंधारा घाला अशा सूचना लघुपाटबंधारे विभागाला केल्या. तसेच नळपाणी पुरवठ्याच्या योजना ज्या ठिकाणी आहेत त्या गावात मोठा बंधारा घालण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण करा असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी लघुपाटबंधारे विभागाला दिले.निधीअभावी भूजलच्या योजना ठप्पभूजल सर्र्वेक्षण विभागामध्ये सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये विविध प्रकारच्या ५४ योजना प्रस्तावित आहेत. मात्र, या योजनांसाठी निधीच उपलब्ध झाला नसल्याने ही कामे सुरु होऊ शकली नाहीत अशी माहिती या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.एम.आर.ई.जी.एस.मधून निधीची तरतूद करापावसाळ्यामध्ये चिऱ्यांच्या खाणींमधून पाण्याची साठवण केली तर भविष्यात पाणीटंचाई उद्भवणार नाही अशी सूचना सदस्य जनार्दन तेली यांनी वर्षभरापूर्वी केली. त्यानुसार देवगड तालुक्यातील पडेल येथील एका खाणीमध्ये तब्बल २ लाख ४ हजार लीटर एवढा पाणीसाठा सद्यस्थितीत उपलब्ध असून यावर शासनाचे केवळ १ लाख ७० हजार रुपये खर्च झाला आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगत एम.आर.ई.जी.एस. मधून यासाठी निधीची तरतूद करा असे सांगण्यात आले.