शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

लंडनमध्ये जपल्या जाताहेत सुवर्णदुर्गच्या स्मृती!

By admin | Updated: February 19, 2016 00:20 IST

सेवेनद्रुग कॅसल : वारसाहक्क श्रेणीत मांडल्या जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या इमारतींमध्ये समावेश

दापोली : सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याने मोहीत झालेल्या हर्णैजवळील सुवर्णदुर्ग किल्ल्याची स्मृती आजही लंडन येथे जपली जात आहे. इंग्लंडमधील वारसाहक्क श्रेणीत मांडल्या जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या २१ इमारतींमध्ये सेवेनद्रुग कॅसलने स्थान मिळवले आहे.हर्णैजवळील पाण्यामध्ये असलेल्या सुवर्णदुर्ग शिवाजी महाराजांनी हा दुर्ग १६६०मध्ये आदिलशहाकडून जिंकला आणि १८१८पर्यंत हा सुवर्णदुर्ग स्वराज्यातच राहिला. त्यानंतर सिद्धीने सदरचा दुर्ग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरखेल कान्होजी आंग्रेनी हाणून पाडला. त्यानंतर मात्र पेशव्यांनी ब्रिटिशांशी हात मिळवणी करत सुवर्णदुर्गवर चढाई केली व आतील सर्व लूट करून इंग्रजांनी तो किल्ला पेशव्यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पुन्हा दुर्ग ब्रिटिशांच्या कारकिर्दीत चर्चेत आला. त्याला कारण होते सर विल्यम जेम्स! वयाच्या १८व्या वर्षी जेम्स एक जहाज घेऊन वेस्टइंडिजला जात असताना सागरी मोहिमेत स्पॅनिश लोकांनी त्याला पकडले आणि शिक्षा म्हणून पुन्हा समुद्रात सोडले. त्यानंतर जेम्सने १७४७ साली ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी धरली. व्यापारी जहाजाच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. त्याकाळी समुद्रात असणारे चाचे मालवाहू बोटींची लूट करत असत. या चाच्यांना रोखण्याचे प्रयत्न अनेकांनी करुन पाहिले. पण, यात कोणीच यशस्वी झाले नव्हते. याची महत्त्वाची जबाबदारी जेम्सने स्वीकारली आणि त्याने बॉम्बे प्लीट नावाची तुकडी भारताच्या किनारपट्टीवर उभी केली.तब्बल ४८ तोफा असलेले प्रोटेक्टर नावाचे जहाज सोबत घेतले आणि समुद्री चाच्यांचा पाडाव करायला जेम्स सज्ज झाला. कोकण किनारपट्टीवर तुळाजी आंग्रे यांच्या तुकडीचा त्यात समावेश होता. हर्णैजवळ असणाऱ्या सुवर्णदुर्गच्या आश्रयाने मराठ्यांची ही तुकडी इस्ट इंडिया कंपनीच्या मालवाहू जहाजांना लक्ष करुन लूट करत असे. या गोष्टीचा बिमोड करण्यासाठी जेम्सने थेट सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला व आपले नाविक दल, तोफखाना यांचा पुरेपूर वापर करत १७५५ साली जेम्सने सुवर्णदुर्ग ताब्यात घेतला.१७५९मध्ये जेम्स इंग्लंडला परतला तेव्हा तो एक गर्भश्रीमंत म्हणून! आपली पत्नी अ‍ॅन गोगार्ड आणि दोन मुलांसह तो सोळा परागण्यातल्या गेराड स्ट्रीटवर राहात असे. लंडनमधील वास्तव्यात जेम्स सुवर्णदुर्गला मात्र विसरला नव्हता. १७८३मध्ये जेम्सचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि या किल्ल्यात राहायचे त्याचे स्वप्न अपुरे राहिले. आपल्या पतीची स्मृती जतन करण्यासाठी जेम्सच्या पत्नीने लंडनमध्ये सेवेनद्रुग कॅसल नावाची इमारत उभारली. (प्रतिनिधी)जेम्सच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर १८१६मध्ये लंडनचा माजी शेरीफ जॉन कोडसनने ते किल्लेवजा स्मारक विकत घेतले. त्यानंतर तब्बल दोन दशके ते बांधकाम हस्तांतरीत होत राहिले. मात्र, १९८६पर्यंत जगभरातील पर्यटकांसाठी खुले असणारे हे सेवनद्रुग कॅसल नंतर बंद करण्यात आले.