शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

दुष्काळ परिस्थितीवर हळवे पीक योग्य

By admin | Updated: July 19, 2015 23:37 IST

कमी पाऊस : पर्यायी उपायाचा स्वीकार करण्याची गरज

शिवाजी गोरे- दापोली -कोकणात दरवर्षी नैसर्गिक बदलाचा परिणाम जाणवतो. कधी काळी कोकणात धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे. त्यामुळे भविष्यात कोकणचे मुख्य पीक भात धोक्यात येऊ शकते. नैसर्गिक बदलाला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्याने आता नागली व हळव्या भातपिकाकडे वळण्याची गरज आहे. कारण हळवी भात पिके १०० ते १२० दिवसात तयार होतात. या पिकांना पाऊसही कमी लागतो. त्यामुळे शेतकऱ्याने कमी पावसात कोणती पिके घ्यावीत, याचा प्राधान्याने विचार करायला हवा, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (डायरेक्टर आॅफ रिसर्च सीड) डॉ. ए. के. शिंदे यानी व्यक्त केले.कोकणात गेली दोन वर्षे ऐन भात लावणीत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची भातलावणीची कामे रखडतात. भात लावणीला उशीर झाल्याने त्याचा पिकावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कमी पावसात कोणती पिके घेता येतील, यावर कृ षी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ संशोधन करीत असून, उशिरा भात लावणी होऊनसुद्धा भातपीक घेण्यासाठी कमी कालावधीतील हळव्या भाताच्या जातीचा पर्याय समोर आला आहे. त्याचप्रमाणे नागली पीकसुद्धा कमी पावसाचा पर्याय म्हणून समोर आले आहे. कमी पावसात उशिरा लावणीसाठी रत्नागिरी - ७३, कर्जत - १८४, रत्ना कर्जत -१, रत्नागिरी - २४, रत्नागिरी - ७११, रत्नागिरी - १, कर्जत - ४ या हळव्या जातीच्या वाणांचा वापर करता येईल. यामुळे उशिरा पेरणी व लावणी करुनसुद्धा फायदा होईल.नागली पिकाची लागवड वरकस आणी उतार असलेल्या जमिनीत केली जाते. खरीप हंगामात कोकणात नागलीची लागवड केली जाते. हलक्या सरीचा पाऊससुद्धा यासाठी चालू शकतो. रोपे तयार झाल्यावर उशिरा लावणी करुनसुद्धा नागलीचे चांगले पीक येऊ शकते. त्यामुळे नागली पीक घेणे योग्य आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. भाताची लावणी अजूनही संपलेली नाही. भात लावणीला उशीर झाला आहे. त्यामुळे भात पिकाच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाणथळ जमिनीत शेतकऱ्यानी भातलावणी केली आहे. परंतु ज्या ठिकाणी पाणीच नाही, त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची भात लावणी रखडली आहे. शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा पर्याय स्वीकारायला हवा. पेरणी झाल्यावर किंवा लावणी झाल्यावर पावसाने दडी मारली तर शेततळ्यातील पाणी देऊन भाताची रोपे जगवता आली पाहिजेत. त्यादृष्टीने शेतकऱ्याने आपल्या शेतीत पाण्याची सोय करायला हवी. भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्याने सर्व पर्याय उपलब्ध करुन घ्यायला हवेत.शेतकरी दोन - तीन वर्षे जुनेच भात बियाणे वापरतात. परंतु दरवर्षी संकरित बियाणे वापरल्यास भातपीक जोमाने येते. परंतु तेच बियाणे दरवर्षी वापरल्यास त्याचा जोम कमी कमी होत जातो. भात पिकात अनेक संशोधन करुन शास्त्रज्ञ शेतकऱ्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन देत आहे. बियाणे अधिक काळ टिकविण्यासाठी साठवण पद्धतीत सुधारणा करणे आवश्यक आहे. सध्या भात बियाण्याची साठवण करणारी पिशवी कापडी आहे. ही पिशवी केवळ एक ते दोन वर्षे टिकते. परंतु भात बियाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी बियाणे तीन ते चार वेळा वाळवून, प्लास्टिकच्या पिशवीत पॅकिंग केल्याने दोन ते तीन वर्षे बियाणे चांगल्या पद्धतीने राहू शकते.