शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

भूगर्भातील संदेशांवर संशोधन

By admin | Updated: October 13, 2015 00:13 IST

रत्नागिरीतील डॉ. संजय कुलकर्णी बुद्धवंतांच्या यादीत

त्सुनामी किंवा भूकंप येण्यापूर्वी भूगर्भातून काही संदेश मिळतात का? भूगर्भातील ऊर्जा शोधता येईल का? तिचा उपयोग करता येईल का? अशा विविध विषयांवर संशोधन करणारे रत्नागिरीतील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे विज्ञान व मानवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय कुलकर्णी यांची २१व्या शतकातील सर्वोत्कृष्ट बुध्दिमान २००० मान्यवरांच्या यादीत निवड झाली आहे. इंटरनॅशनल बायोग्राफीकल सेंटर, केंब्रीज, इंग्लंड या संस्थेने त्यांची ही निवड केली आहे. डिसेंबर महिन्यात त्यांचा हा शोधनिबंध प्रसिद्ध होणार आहे.उपयोजित गणित या विषयाचे गेली १८ वर्षे फिनोलेक्स अ‍ॅकॅडमीमध्ये अध्यापन करणारे व प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. संजय कुलकर्णी यांनी गुलबर्गा विद्यापीठातून एम. एससी. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथून ‘नॉन न्युट्रिआॅन फ्लुईड फ्लो आॅफ सेकंड आॅर्डर टाईप’ या विषयांतर्गत पीएचडी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर लॅम्बर्ट अ‍ॅकॅडमिक पब्लिशिंग, जर्मनी यांनी त्यांचे ‘इलेस्टो-व्हिसकस फ्लुईड फ्लो’ विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. त्यांचे विज्ञान विषयातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन कमिटीवर ते कार्यरत आहेत. विज्ञानातील संशोधनाबद्दल डॉ. कुलकर्णी यांची दखल घेऊन त्यांची २००० बुध्दिवंतामध्ये निवड करण्यात आली आहे. इंग्लंड-केंब्रीज येथील इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटरतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या जर्नलमध्ये त्यांचा शोधनिबंध प्रसिध्द केला जाणार आहे.प्रश्न : ‘इलेस्टो - व्हिसकस फ्लुईड फ्लो’ या विषयाचा तुम्ही शोधनिबंध मांडला आहे. नेमके तुम्ही काय संशोधन केले आहे?उत्तर :जमिनीची पातळी, भूगर्भाची विशिष्ट रचना आहे. परंतु जेव्हा त्सुनामी किंवा भूकंप होतो, त्यावेळी जमिनीतून विशिष्ट कंपने तयार होतात. मात्र, भूकंप किंवा त्सुनामी येण्यापूर्वी कंपने कशी येतात, त्यामध्ये वाढ होते का? त्सुनामीपूर्वी संदेश मिळू शकतील का? याबाबतचे संशोधन केले आहे. तेच या शोधनिबंधात मांडले आहे.े प्रश्न : तुमच्या संशोधनाचा फायदा आणखी कशासाठी होणार आहे ?उत्तर :सच्छिद्र खडकातून वाहणाऱ्या तेलाचा प्रवाह शोधण्यासाठी, पृथ्वीच्या आंतरभागाकडून बाह्य आवरणाकडे येणारी भूगर्भीय ऊर्जा शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी, फुफ्फूसामधील विविध द्रवांच्या प्रवाहामध्ये होणारे जैवयंत्र अभियांत्रिकीचे उपयोजन, रासायनिक यंत्र अभियांत्रिकी यरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये या संशोधनाचा फायदा होणार आहे. प्रश्न : आजपर्यंत आपले किती शोधनिबंध प्रसिध्द झाले. उत्तर :राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत विविध विषयांवरील २५ शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. जरनल पोरस मीडिया (युएसए), इंटरनॅशनल जरनल यरोस्पेस अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग (युएसए), इंडियन जरनल आॅफ इंजिनिरिंग अँड मटेरियल सायन्स, डिफेन्स अँड जरनलमध्ये शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. त्याचप्रमाणे लॅम्बर्ट अकॅडमिक पब्लिशिंग, जर्मनी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘इलेस्टो-व्हिसकस फ्लुईड फ्लो’ पुस्तकदेखील प्रसिध्द केले आहे.प्रश्न : राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचे लेखन प्रसिध्द झाले आहे. तुम्ही अन्य कोणत्या कमिटीवर काम केले आहे का ?उत्तर :जरनल आॅफ पोरस मीडिया, नॅशनल अ‍ॅड इंटरनॅशनल जरनल बोर्ड, वर्ल्ड अकादमी आॅफ सायन्स, इंजिनिअरिंग अ‍ॅड टेक्नोलॉजी या कमिटीवर कार्यरत आहे. या कमिटीव्दारे मार्गदर्शन किंवा संशोधन साहित्य तपासणी करण्यात येते. इतकेच नव्हे; तर आवश्यक त्यावेळेला विविध सेमिनारमध्ये मार्गदर्शन करत आहे. प्रश्न : शोधनिंबधाची निवड कशी केली जाते.उत्तर :इंटरनॅशनल बायोग्राफीकल सेंटरकडून गुणवत्तेवर शोधनिबंधांची निवड केली जाते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्याकडून यावर्षी प्रसिध्द होणारे नववे जर्नल असून, त्यामध्ये शोधनिबंधाचा समावेश होणार आहे. केवळ संशोधन विचारात न घेता त्याचा अन्य विविध क्षेत्रात होणारे उपयोग विचारात घेतले जातात.प्रश्न : गेली १८ वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत ?उत्तर :विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करावे. अभ्यासिक पुस्तकांबरोबर अन्य वाचन करणे आवश्यक आहे. अन्य संदर्भ पुस्तकांचा वापर करून अभ्यास करावा. मी स्वत: इथेच राहून पीएच. डी. पूर्ण केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कष्ट, चिकाटी व जिद्दीने अभ्यासक्रम पूर्ण करावा. यश आपोआप मिळते. प्रश्न : अठरा वर्षांच्या अध्यापनात लक्षात राहिलेले विद्यार्थी?उत्तर :गेल्या अठरा वर्षात अनेक विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याची संधी मिळाली. परंतु चिकाटी, जिद्दीने यश संपादन करणारे विद्यार्थी मात्र कायम लक्षात राहतात. प्रथमेश कारखानीस (मेकॅनिकल इंजिनिअरिंग), प्रवीण राहुल (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग), सुनीत पटवर्धन (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) यांनी मिळविलेल्या यशाबद्दल ते कायमस्वरूपी स्मरणात आहेत. विद्यार्थ्यांचे यश ही आमच्या अध्यापनाची पोच असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. - मेहरुन नाकाडे