शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

पंचम खेमराज!

By admin | Updated: November 28, 2014 23:56 IST

मालवणी तडका

सकलो : पंचम खेमराज! तुमची आमची सगळ्यांचीच शान म्हंजेच पंचम खेमराज. तुकलो : शिवराम राजे भोसले यांनी युवा पिढी सुशिक्षित होवक व्हयी म्हनान त्या काळात म्हंजे पन्नास वर्सांपूर्वी या संस्थेची स्थापना केली. ती धंदो म्हनान न्हय, तर आपल्या परिसरातील युवा पिढी शिकाक व्हयी म्हनान. सकलो : आनी आता बातमी वाचून खूप वायट वाटला. तुकलो : जो जो त्या महाविद्यालयातील शिकलो, तेका या वादाची बातमी वाचून खूप वायट वाटला. सकलो : शिवराम राजेंका पन कधी वाटला नसला की, ह्या थरात ह्यो असो प्रसंग येयत म्हनान. तुकलो : सावंतवाडी ही सुसंस्कृतांची आनी विचारवंतांची, समजूतदारांची म्हनान मानली जाता. त्या मानन्याक कोनी पन तडो जावक देव नुको. तसो कोन प्रयत्न करीत तर पाटेश्वराची आनी उपरलकराची काठी तेच्या पाठीर बसतली. सकलो : अगदी खरा. शिक्षन संस्था म्हंजे धंदो ह्या आता सुरू झाला. पन त्या काळात...तुकलो : पन त्या काळात शिवराम राजेंनी धंदो बघूक नाय व्हतो. तशी तेंका गरज पन नाय व्हती. शेवटी राजा मानूस तो. सकलो : आपली येनारी पिढी शिकान मोठी व्होवची म्हनान तेनी सगळा केला, पन तिच पिढी इतकी मोठी झाली की, ती संस्था माझी की तुझी, ह्या वादात अडाकली. तुकलो : घरगुती प्रश्न शक्य तितको चार भिंतीत सोडवललो बरो. तो ज्या येळाक चव्हाट्यावर येता, त्या येळाक घरातल्या प्रत्येक सदस्यान इचार करूक व्हयो. सकलो : अगदी बरोबर. कोनतरी कायतरी सागता आनी आपून कायतरी चुकीचा करून घरान्याक चुकीच्या मार्गार न्हेव नये. तुकलो : राजकारना आमीव बघली, अनुभवली. पन पंचम खेमराज ह्या महाविद्यालय सगळ्या युवा पिढीचा गोकूळ हा. थय नुको राजकारन. सकलो : कोनतरी म्हनतलो, तुझो काय संबंध? तू गप रव. पन ये. यस. प्रियोळकरांनी आमका केमिस्ट्री शिकवली हा. त्या येळाक काय कळाक नाय...तुकलो : पन आता केमिस्ट्री कळता. हेची केमिस्ट्री कशी जुळली, कशी जुळली आनी तेचा आऊटपूट काय, ह्या आता आमकाव कळाक लागला. सकलो : खरा हा. त्या ग्राऊंडवर जे खेळाक तयार झाले, जिमखाना हॉलमध्ये रॅकेट फिरवनारे आता म्हातारे झाले आसतीत. तेंनी ही वादाची बातमी वाचली आसात, तर तेंका पन ते दिवस आठावतले. तुकलो : आठवनी तर भरभरून हत. तुमच्यो, आमच्यो सगळ्यांच्यो. त्या महाविद्यालयात कित्येक जनांची नाळ जोडलली हा. सकलो : ही नाळ प्रत्येकाची वलीच हा. तुकलो : लायब्री आठवली आनी डोळ्यात पानी इला. खूप काय काय डोळ्यासमोरसून गेला. धमाल आठावली, मजा आठावली. आमच्या काळातले फिशपॉर्इंट आठावले. आनी ख्रराच डोळे पोनावले. सकलो : तसो आमचो काय संबंध नाय, पन सहवासाचो संबंध खूप हा. ती शाळा भावीपिढी घडवनारा ता मंदिर हा. तेतूर नुको राजकारन. तुकलो : घरगुती इषय. खूप नाजूक आसतत ते. हेतू शुध्द ठेवन चर्चेन सोडवा. आपल्या जिल्ह्याची शान ता कॉलेज हा. तेची नशा करू नुको, ही आमची इनंती हा. सकलो : अगदी बरोबर. तुमका सगळ्यांका पाटेश्वर सुबुध्दी देवो आनी कसलाच राजकारन नाय व्हता. आमचा महाविद्यालय गोकूळ सारख्या नांदो. तुकलो : ही सगळ्यांची इच्छा हा. सत्वशिलादेवी भोसलेंची स्तुती करनारी मंडळी व्यासपीठावर खूप येळा बघली. तीच मंडळी अशी कशी वागली, ह्योच प्रश्न हा. सकलो : कोनचा बरोबर, कोनचा चूक ह्या आमका म्हायत नाय. ता त्या पाटेश्वराक म्हायती. ह्या गनित तेनाच सोडवक व्हया आनी आपल्या सुंदरवाडीची शान अबाधित ठेवची, हीच आमची इच्छा. तुकलो : अगदी बरोबर. कोनी पन राजकारन मनात हाडू नये. तेच्यासाठी चार चार पावला पाठी या आनी पंचम खेमराज पाच मुठांची वज्रमूठ व्होवदे, अशी पाटेश्वराक प्रार्थना करू या. - विजय पालकर