शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हवामानावर संशोधन काळाची गरज : नाईक

By admin | Updated: December 5, 2015 23:30 IST

विज्ञान परिषदेकडे अधिकाऱ्यांची पाठ

कुडाळ : भविष्यात जीवनात हवा आणि हवामानावर संशोधन करणे काळाची गरज आहे. गेल्या काही महिन्यात सिंधुदुर्गासह राज्यात पाऊस फारच कमी प्रमाणात झाला असून या परिस्थितीचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी यांनी २३ व्या राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे उद्घाटन प्रसंगी केले. भारत सरकारच्यावतीने असलेल्या या राज्यस्तरीय विज्ञान परिषदेकडे प्रशासनाने व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली. यामुळे उपस्थितांमध्ये प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नाराजी व्यक्त होत होती. नेरूरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्र येथे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यातर्फे आयोजित केलेल्या २३ व्या राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिज्ञासा संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र्र दिगे, बी. बी. जाधव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम. जी. मातोंडकर, वसुंधरा संस्थेचे विश्वस्त अविनाश हावळ, वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बर्डे, वसुंधरा संस्थेचे समन्वयक के. एम. पटाडे, लुपिन फाउंडेशनचे नारायण परब, राजू शेट्ये, परशुराम परब व मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी केलेल्या प्रास्ताविकात पटाडे यांनी वसुंधराने विज्ञानाचा सुरु केलेल्या कार्याचा धावता आढावा सांगितला. वसुंधराने विज्ञान क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले आहेत असेही ते म्हणाले. गेली चार वर्षे हे काम करण्यात येते. आजपर्यंत वसुंधरामधून वेद दळवी व मिहीर पाटील हे दोन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले होते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. व्ही. प्रभूखानोलकर यांनी केले. जिल्ह्याला पहिल्यांदाच ही परिषद घेण्याचा प्रथमच मान मिळाला असतानाही या राज्यस्तरीय परिषदेकडे आमदार वैभव नाईक, सभापती गुरुनाथ पेडणेकर या लोकप्रतिनिधींनी आवर्जून उपस्थिती लावली. मात्र, प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता. (प्रतिनिधी) ६६ प्रकल्प : ३0 जणांची निवड या परिषदेच्या निमित्ताने राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील २१२ बालवैज्ञानिक ६६ प्रकल्पांसह येथे आले असून या ठिकाणी विज्ञानाबाबत विचारांची देवाणघेवाण या बालवैज्ञानिकांमध्ये होणार आहे. राज्यस्तरावरील या ६६ प्रकल्पांमधून राष्ट्रीय स्तरासाठी ३० प्रकल्पांची निवड होणार आहे असे दिघे म्हणाले.