शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

साहीलला जेरबंद करुनच मकेश्वर यांनी पिच्छा सोडला...!

By admin | Updated: July 29, 2015 21:58 IST

आपल्या नेटवर्कच्या बळावर जेलमधून पळालेल्या ३ नामचीन गुंडांना जेरबंद करून त्यांनी हॅटट्रिक साधली आहे.

सुभाष कदम -चिपळूण -गुन्हेगार कितीही सराईत असला किंवा नामचीन असला तरी त्याला पकडण्याचा विडा उचलणाऱ्या अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती किती तीव्र आहे, त्यावर त्या अधिकाऱ्याचे यश अवलंबून असते. जिल्हा पोलीस दलात चिपळूणचे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेल्या प्रमोद मकेश्वर यांच्याबाबतीतही तसेच घडले. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर व आपल्या नेटवर्कच्या बळावर जेलमधून पळालेल्या ३ नामचीन गुंडांना जेरबंद करून त्यांनी हॅटट्रिक साधली आहे.पोलीस दलाबाबत अनेक शंका कुशंका घेतल्या जातात. अनेकवेळा पोलिसांवर संशय व्यक्त केला जातो. पोलीस लाचखाऊ असतात, असा शब्द परवलीचा बनला आहे. त्यामुळे समाजातील पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. चिपळुणातील काही पोलीस साहील कालसेकरला मदत करतात, असा आरोपही होत आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी ठरलेल्या कालसेकरला अटक करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. साहीलने पोलीस कॉन्स्टेबल उदय वाजे यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी जमावाने त्याला बेदम मारले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात ठेवले असतानाच पोलिसांची नजर चुकवून १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता त्याने पलायन केले होते. पोलीस त्याच्या मागावर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी याप्रकरणी साहीलला त्वरित जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना साहीलच्या सवयी व साहीलबाबत अधिक माहिती असल्याने त्यांच्यावर जास्त विश्वास टाकून या मोहिमेचे सूत्र जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे यांनी पोलीस निरीक्षक मकेश्वर यांच्याकडे सोपवली होती. मकेश्वर यांनी सापळा रचला होता. सुरुवातीला दोन दिवस अंदाज आला नाही. परंतु, नंतर तो मुंबईत गेला आणि चक्रे वेगाने फिरली. मकेश्वर व त्यांचे सहकारी स्वत: मुंबईत गेले. तेथे त्यांनी ४ टॅक्सी बुक केल्या होत्या. स्वत: मकेश्वर मुंडन करुन मिशी काढून वेश बदलून मिशनवर जाणार होते. तोच साहील मुंबईतून देवरुख येथे आला. साहील वापरत असलेल्या सीमची माहिती पोलिसांना मिळाली. तो सातत्याने सीम बदलत होता. त्याचा मागोवा पोलीस घेत होते. स्वत:ला हुशार समजणाऱ्या साहीलवर पोलिसांची करडी नजर होती. परंतु, तो रेंजमध्ये येत नव्हता. साहीलने या काळात पैशासाठी अनेकांना फोन केले. ते सर्व कॉल ट्रेस करण्यात आले. अखेर देवरुख येथील एका व्यक्तीशी साहीलने संपर्क साधला. याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी संबंधित व्यक्तीला गाठले. साहील पुन्हा पैसे नेण्यासाठी त्या व्यक्तीकडे येणार होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन साहीलसाठी सापळा रचला होता. या सापळ्यात साहील अलगद सापडला. मकेश्वर यांनी अत्यंत हुशारीने साहीलला जेरबंद केले. साहीलच्या हाती पैसे मिळाले असते किंवा दोन दिवस उशीर झाला असता तर तो अजमेरला पळाला असता. तेथे तो फुकट जगला असता आणि आमचा ताप अधिक वाढला असता. मग त्याला शोधणे कठीण होते, असे पोलीस निरीक्षक मेकश्वर यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन व नागरिकांनी केलेले सर्वतोपरी सहकार्य यामुळे हे शक्य झाल्याचे मकेश्वर यांनी सांगितले. यांच्या विश्वासामुळेच आपण हे आव्हान लिलया पेलल,े असेही मकेश्वर म्हणाले. घरफोडी प्रकरणातील किरण मोरे, बलात्कारप्रकरणी रितेश कदम व आता विविध गुन्ह्यातील साहील कालसेकर हे तिन्ही आरोपी पळून गेले होते. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी हे तिन्ही आरोपी पकडण्यात यश मिळविले. त्यामुळे त्यांनी अनोखी हॅटट्रिक नोंदवली आहे. या कामगिरीबद्दल मकेश्वर यांचे अभिनंदन होत आहे.बुधवारचा योगायोग... साहील कालसेकर बुधवारी जिल्हा रुग्णालयातून पळाला आणि पोलिसांनी त्याला बुधवारीच पकडले. पोलीस दलाची या प्रकरणामुळे प्रतिमा मलिन झाली होती. चार कर्मचारी निलंबित होते. आता साहील पकडला गेल्याने पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले आहे.