शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
4
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
5
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
8
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
9
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
10
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
11
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
12
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
13
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
14
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
15
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
16
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
17
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
18
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
19
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
20
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच मोठे बदल

By admin | Updated: December 10, 2014 23:51 IST

अतुल रावराणे : पक्षनेतृत्वाकडून दगाबाजीची दखल

वैभववाडी : विधानसभा निवडणुकीत कणकवलीसह तिन्ही मतदारसंघात पक्षाच्याच काही निवडक पदाधिकाऱ्यांनी विरोधी उमेदवारांशी गुप्तसंधान साधून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दगा दिला. या प्रकाराची पक्षनेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच मोठ्या बदलाचे संकेत नेतृत्वाने दिले आहेत, अशी माहिती युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.येथील सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहात रावराणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महेश रावराणे, धुळाजी काळे आदी उपस्थित होते. अतुल रावराणे म्हणाले, शेवटच्या क्षणी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा झाली. त्याचप्रमाणे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याचबरोबर काही पदाधिकाऱ्यांनी विरोधकांशी संधान साधल्यामुळे फटकाही मोठ्या प्रमाणात बसला. ही बाब आपण नुकत्याच मुंबईत झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडली.राष्ट्रवादी भवनातील आढावा बैठकीला पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसेपाटील, छगन भुजबळ आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. पक्षाचे निरीक्षक आमदार किरण पावसकर यांनीही निवडणूक काळातील जिल्ह्यातील स्थिती नेतृत्वासमोर मांडली. त्यामुळे निवडणुकीतील काही पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या दगाबाजीची पक्ष नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात पक्षांतर्गत फेरबदलाचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आठही तालुक्यात राष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीसाठी आपणास सूचना दिल्या आहेत, असे रावराणे यांनी स्पष्ट केले.रावराणे म्हणाले, पक्षश्रेष्ठींच्या सुचनेप्रमाणे कणकवली मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचा दौरा आपण करणार आहोत. या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, ज्येष्ठ नेते नंदूशेठ घाटे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, सुरेश दळवी, प्रसाद रेगे, युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, अबिद नाईक आदींसोबत चर्चा करून पक्षाची पुनर्बांधणी करताना तरूणांना संधी देण्याचा प्रयत्न राहील. तसेच संघटना बांधणीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांचे दौरेही आगामी काळात होतील, असेअतुल रावराणे यांनी यावेळीसांगितले. (प्रतिनिधी)