शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

हजारो बाधित रूग्णांना जीवदान

By admin | Updated: July 25, 2014 22:54 IST

सर्प-विंचू दंश : दिलासादायक उपचारांमुळे दगावणाऱ्यांच्या संख्येत घट

प्रकाश वराडकर - रत्नागिरी , जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत विषारी सापांचा दंश व विंचूदंशाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली आहे. गेल्या सव्वा चार वर्षांच्या काळात जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सर्पदंशाच्या १३ जणांना, तर विंचूदंश झालेल्या ३ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. जिल्हा रुग्णालयातील सुत्रांनी ही माहिती दिली. मात्र, सर्प व विंचूदंश झालेल्या रूग्णांना उशिराने दाखल केलेल्या अनेक रुग्णांचे प्राण अथक प्रयत्नांनंतरही जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाचवले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात सध्या लावणीसह शेतीची कामे सुरू आहेत. याच काळात सर्प व विंचूदंशाचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा विंचूदंश वा सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश झाल्याचे लक्षातही येत नाही. मात्र, त्यानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. विंचूदंशानंतर रक्तदाब कमी जास्त होणे, नाडीचे ठोके कमी जास्त होणे, हृदयाचे ठोके वाढणे, कमी होणे असा त्रास सुरू होतो. त्यामुळे असा त्रास सुरू होताच तातडीने विष उतरविण्यासाठी रुग्णाला दवाखान्यात दाखल करणे आवश्यक असते. अनेकदा उशीर झाल्याने रुग्णांच्या शरीरात विष भिनते. त्यामुळे विष उतरवण्यासाठी अधिक प्रमाणात इंजेक्शन्स द्यावी लागतात.विंचूदंशाचे प्रमाणही जिल्ह्यात अधिक आहे. खेड, दापोली विभागातील गडद काळ्या रंगाचे विंचू अतिविषारी (टॉक्सिक) असतात. गेल्या सव्वा चार वर्षांच्या काळात जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या विंचूदंशाच्या रुग्णांपैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला.मात्र, यातील तीनही बळी हे २०१०-११ व २०११-१२ या दोन वर्षांतील आहेत. गेल्या सव्वा दोन वर्षांच्या काळात विंचूदंशाचे रुग्ण वाढले असले तरी योग्य व वेळीच उपचारामुळे हजारो लोकांचे जीव वाचले आहेत.जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २०१३-१४ यावर्षी विंचूदंशाचे ३४०५ रुग्ण, तर सर्पदंशाचे १२१३ रुग्ण दाखल झाले होते. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील अ‍ॅन्टी स्नेक व्हॅक्सीन १५, तर अ‍ॅन्टी स्कोर्पियन व्हॅक्सीन ५ या प्रमाणात ठेवण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयात या औषधांचा साठा अधिक आहे. ज्या रुग्णालयांना वा प्राथमिक आरोग्य केंद्राना या औषधांची अतिरिक्त गरज भासली तर तत्काळ उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली. सनसर्पदंश रुग्णदगावलेले२०१०-११५५०३२०११-१२५३४४२०१२-१३३९६३२०१३-१४५०३२२०१४-१५१२६१(एप्रिल ते जून)एकूण२१०९१३इंगळी अधिक विषारी...जिल्ह्यात चिपळूण, खेडमध्ये अतिविषारी इंगळी (विंचू) चे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्या भागातील इंगळीदंशाच्या रुग्णांना विषबाधा अधिक होण्याचे प्रमाण पाहता व्हॅक्सीनचे डोस अधिक द्यावे लागतात. कोब्रा जातीचे नाग, धामण, घोणस, मण्यार, फुरसे यांसारखे विषारी साप जिल्ह्यात आढळून येतात. विंचू व सर्पदंश झाल्यानंतर उशिराने रुग्ण उपचारास आला तर काही वेळा त्याला ३० ते ३५ इंजेक्शन्सही द्यावी लागतात. दोन वर्षांपूर्वी डेरवण रुग्णालयात एका रुग्णाला ३५ व्हॅक्सीन्सचा डोस द्यावा लागला होता, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. वर्षसर्पदंश/मृत्यूविंचूदंश/मृत्यू २०१०-११५५०/३२६९/१२०११-१२५३४/४१५७/२२०१२-१३३९६/३१६८/०२०१३-१४५०३/२३०९/०२०१४-१५ १२६/११०८/०(एप्रिल ते जून)एकूण