शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी महोत्सवात केसरकरांचा नागरी सत्कार

By admin | Updated: December 9, 2014 23:21 IST

समित्यांची घोषणा : बबन साळगावकर यांची बैठकीत माहिती

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पालिकेचा एक नगरसेवक मंत्रिपदापर्यंत पोचू शकल्याने हा नववा महोत्सव आमच्या नवलाईचा असणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. या महोत्सवाच्या निमित्ताने नव्यानेच मंत्री झालेल्या दीपक केसरकर यांचा शहराच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी साळगावकर यांनी दिली.या महोत्सवासाठीच्या समित्या सोमवारी पालिका बैठकीत जाहीर करण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक सुभाष पणदूरकर, विलास जाधव, देवेंद्र टेमकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, साक्षी कुडतरकर, अफरोझ राजगुरू, किर्ती बोंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.महोत्सवाच्या वेगवेगळ््या समित्या तयार करण्यात आल्या असून या समित्यांमध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची वर्णी लावण्यात आली आहे. यामध्ये समन्वय स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रम, स्टॉल, कायदेविषयक सल्लागार, प्रायोजक, स्टेज, निवास व्यवस्था, विद्युत रोषणाई, बैठक व्यवस्था, शोभायात्रा, स्वच्छता व पाणीपुरवठा, सुरक्षा व स्वंयसेवक, पाककला समिती आदी समित्या नेमण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीवर नगरसेवक हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या समित्यांच्या बैठका महोत्सवाच्या पूर्वी होणार असून त्यात महोत्सवाचे नियोजन करण्यात येणार आहेत. या समित्याच्या नियोजनाप्रमाणेच महोत्सव होणार असल्याचे नगराध्यक्षांनी बैठकीत स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सुरेश प्रभूही येणारसावंतवाडी नगरपालिकेचा नववा महोत्सव यावर्षी होत असून या महोत्सवाचा दुहेरी आनंद आहे. येथील एक नगरसेवक राज्यमंत्रिपदापर्यंत पोहोचला असून त्यांचा यानिमित्ताने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार असल्याचे साळगावकर म्हणाले.या महोत्सवाचे कार्यक्रम अद्याप निश्चित झाले नसून कार्यक्रम ठरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.