शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

कळसवली प्राथमिक शाळेला ‘आयएसओ’

By admin | Updated: March 2, 2016 23:57 IST

राजापूर तालुका : मानांकन मिळविणारी तालुक्यातील पहिलीच शाळा

वाटूळ : राजापूर तालुक्यातील कळसवली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा नं. १ला अत्यंत प्रतिष्ठेचे ‘आयएसओ’ मानांकन जाहीर झाले आहे. २६ जानेवारी २०१६ ते १४ सप्टेंबर २०१८ असे दोन वर्षांसाठी हे मानांकन आहे. हे मानांकन मिळालेली राजापूर तालुक्यातील कळसवली ही पहिली शाळा ठरली आहे.राष्ट्रीय महामार्गापासून ६ किलोमीटर आत असलेल्या या अत्यंत दुर्गम भागातील शाळेची ही प्रगती थक्क करणारी आहे. १२०० लोकसंख्या असलेल्या कळसवली गावातील शाळेची पटसंख्या ७१ इतकी असून, शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. मुख्याध्यापक रमाकांत गार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक सीताराम कोसंबी यांनी शाळेचा संपूर्ण कायापालट करुन दाखविला आहे. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून २ लाख ५ हजार इतकी रक्कम शाळेने प्राप्त केली आहे. शाळेमध्ये संगणक-प्रिंटरसहीत झेरॉक्स उपलब्ध असून, विद्यार्थी स्वत: या गोष्टी हाताळतात.शाळेच्या दर्शनी भागामधील वाढदिवस बाग अत्यंत आकर्षक असून, प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या वाढदिवसाला एक रोप लावून या बागेचे जतन व संवर्धन करत असतो. भव्य असा प्रार्थना हॉलही शाळेमध्ये बांधण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून घेताना मुलांना किल्ल्यांची माहिती होण्यासाठी शिक्षिका भूमिका सावंत यांच्या प्ररेणेने उत्तमप्रकारे किल्ल्यांची प्रतिकृती लावून तसेच शाळेच्या दर्शनी भागावर व वर्गामध्ये शिवरायांच्या जीवनातील ठळक प्रसंगांची चित्रे बसवून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाच्या आठवणी मूर्त स्वरुपात जाग्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.शाळेच्या यशामध्ये मुख्याध्यापक रमाकांत गार्डी, शिक्षक सीताराम कोसंबी, वृशाली मसुरकर, भूमिका सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर शेवडे, तुळसवली सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, केंद्रप्रमुख उदय पांगरीकर यांचा सहभाग आहे. आयएसओ मानांकन मिळवणारी राजापूर तालुक्यातील ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त करणारी कळसवली ही पहिलीच शाळा ठरल्याने माजी शिक्षण सभापती शरद लिंगायत, उपसभापती उमेश पराडकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सोळुंके आदींनी अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)