शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

अकरावीची पहिली यादी जाहीर

By admin | Updated: July 3, 2014 23:58 IST

दुसरी यादी ८ जुलैला : विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमध्ये गर्दी

कणकवली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीतील प्रवेशाचे वेध लागले होते. गुरूवारी पहिली निवड यादी जाहीर करण्यात आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेक महाविद्यालयांनी ही निवड यादी आपल्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.दहावीच्या निकालानंतर २७ जून ते २ जुलै या कालावधीत अकरावी प्रवेशासाठी अर्ज वितरीत करण्यात आले होते. यावर्षी जिल्ह्यात ३ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य श्रेणी तर ५ हजार २२७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. १६ जुलै रोजी अकरावीचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी ९ जुलैला निवड यादीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.गुरूवारी महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाप्रमाणे अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली. कणकवली महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेसाठी खुल्या प्रवर्गामधून ९७.८० टक्के गुणांपासून सुरु झालेली ही यादी ९१.८० टक्केवर बंद झाली. इतर मागास प्रवर्गामधून ९१.८० टक्के गुणांपासून सुरू झालेली यादी ८७.६० टक्केवर बंद झाली. वाणिज्य शाखेसाठी खुल्या प्रवर्गामधून ९५.६० टक्के गुणांपासून सुरु झालेली ही यादी ८४.२० टक्केवर बंद झाली. इतर मागास प्रवर्गामधून ८३.८० टक्के गुणांपासून सुरू झालेली यादी ७७.६० टक्केवर बंद झाली. कला शाखेसाठी खुल्या प्रवर्गामधून ८४.४० टक्के गुणांपासून सुरु झालेली ही यादी ५६ टक्केवर बंद झाली. इतर मागास प्रवर्गामधून ६६.४० टक्के गुणांपासून सुरू झालेली यादी ५६.२० टक्केवर बंद झाली. तर व्होकेशनलमधील अकाऊंटींग अ‍ॅण्ड आॅडिटींग या विषयासाठी ७९.८० टक्केपासून ४९.४० टक्के, पर्चेसिंग अ‍ॅण्ड स्टोअर किपिंग विषयासाठी ६४.८० टक्केपासून ४३.४० टक्के, आॅफिस मॅनेजमेंटसाठी ६५.४० टक्केपासून ४४.४० टक्के तर टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल टेक्निक्स या विषयासाठी ६६.८० टक्केपासून ५४.२० टक्के गुणांवर ही यादी बंद करण्यात आली आहे. बहुतांशी महाविद्यालयात अशीच स्थिती होती. (वार्ताहर)