शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

इन्सुली ग्रा.पं.ला आठ तास घेराओ

By admin | Updated: June 22, 2017 01:06 IST

वादग्रस्त रस्ता प्रकरण पेटले : अतिक्रमण हटाव नोटीस वाद; अखेर लेखी आश्वासनानंतर आक्रमक ग्रामस्थ झाले शांत लोकमत न्यूज नेटवर्क

बांदा : इन्सुली येथील वादग्रस्त रस्ता प्रकरण पेटले असून अतिक्रमण हटाव नोटिसीवरून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला मंगळवारी सुमारे आठ तास घेराओ घालत धारेवर धरले होते. जोपर्यंत दिलेली नोटीस व घातलेली चुकीची नोंद मागे घेत नाहीत तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा गावकरवाडी ग्रामस्थांनी घेतल्याने याठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. सुमारे शंभरच्यावर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडून मुलांच्या आडून राजकारण करून दिशाभूल करीत गावात दोन गट पाडण्याचा प्रयत्न करीत मुलांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या व वाद निर्माण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी यांचा निषेध केला. अखेर रात्री ८ वाजता इन्सुली सरपंचांनी गांवकर कुटुंबीयांच्या खासगी जागेतील अतिक्रमण गुरुवारपर्यंत काढून टाकण्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर ग्रामस्थांनी घेराओ मागे घेतला. या वादात तेथील प्रभाग क्रमांक ४ मधील ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी यांनी जमीनमालक आणि ग्रामस्थ यांच्यात दिशाभूल करून हा वाद लावला. ग्रामपंचायतीकडे रस्त्याबाबत सातबारावर अथवा पत्र नोंद नसताना येथील गांवकर कुटुंबीयांना रस्त्यापासून सुमारे १२ मीटर अंतरापर्यंत कुंपण घालण्याची नोटीस दिली. तसेच महेश धुरी यांनी सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यांना याठिकाणी आणून गावात वाद निर्माण केला. तर ग्रामस्थांनीही मुलांना शाळेत पाठवू नका असे सांगत वेठीस धरले. तसेच खोटी माहिती देत खासगी जागेतील कुंपण तोडून आमच्या दोन वाडीत वाद लावून दिला. त्यामुळे या वादाला कारणीभूत असणाऱ्या महेश धुरी याला ग्रामपंचायत कार्यालयात बोलवा व त्याला हा वाद मिटवायला सांगा असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. इन्सुली गावातील या दोन वाडीत कोणताही तंटा नसताना आता वाद निर्माण केल्यामुळे गावकरवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी मंगळवारी सकाळी इन्सुली ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. इन्सुली सरपंच उत्कर्षा हळदणकर, उपसरपंच कृष्णा सावंत, ग्रामविस्तार अधिकारी सी. व्ही. राऊळ, ग्रामपंचायत सदस्य सदा राणे, प्रभाकर पेडणेकर, तपस्वी मोरजकर, नीता राणे, समीक्षा गांवकर यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. यावर उपसरपंच कृष्णा सावंत यांनी याबाबत आम्हांला कोणतीही जाणीव न देता सरपंचांनी पत्रव्यवहाराचे काम केल्याचे सांगितले. त्यामुळे याला सरपंच जबाबदार असल्याचे सांगत आक्रमक झालेल्या सावंत यांनी सी. व्ही. राऊळ यांना धारेवर धरले. जर तुम्ही गावात वाद निर्माण करणारे पत्रव्यवहार करणार असाल तर याद राखा असा सूचक इशारा उपसरपंच व सदस्यांनी ग्रामविस्तार अधिकारी राऊळ यांना दिला. यावेळी ग्रामस्थ सचिन पालव यांनी ‘जर तुम्ही एका शेतकऱ्याला अतिक्रमण हटविण्यास सांगून इतरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असाल तर परिस्थितीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत’, असा इशारा दिला. आता गावातील ग्रामपंचायत कार्यालयापासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करूया. बांधकाम करीत असलेले प्रवेशद्वार पाडूया. नंतर सरपंच, उपसरपंच व सदस्यांची अतिक्रमणे व त्यानंतर शेतकऱ्यांची अतिक्रमणे हटवूया असा आक्रमक पवित्रा घेतला. यावर सरपंच हळदणकर यांनी या रस्त्यासंबंधी तक्रार असल्याने नोटीस काढल्याचे सांगितले. तर यावर ग्रामस्थांनी नोटीस काढायची होतीच तर इतर जमीनदारांनाही काढायची होती असे सांगताच सरपंचांनी काढलेली नोटीस मागे घेत असल्याचे सांगितले. वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, नारायण राणे, नाना पेडणेकर या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ग्रामविस्तार अधिकारी राऊळ यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही जनतेचे सेवक आहात याचे भान ठेवा. जनतेला त्रास होईल असे कोणतेही काम कराल तर गाठ माझ्याशी आहे असा गर्भित इशारा रुपेश राऊळ यांनी दिला. आठ तास झालेल्या आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी मोहन भोई, विस्तार अधिकारी धर्णे, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, तंटामुक्त अध्यक्ष उमेश पेडणेकर, पोलीस पाटील जागृती गावडे यांनी तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा केली. गटविकास अधिकारी भोई यांनी जर कोणतेही संमतीपत्र, सातबारा नसेल तर ग्रामपंचायत प्रशासन या रस्त्याबाबत कोणतीही कार्यवाही करू शकत नसल्याचे सांगितले. यावर हा रस्ता अडीच किलोमीटरचा आहे. त्याची मोजणी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे हा रस्ता १३०० मीटर असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून हा रस्ता नोंदणीप्रमाणे नसल्याचे दिसून आले. जर हा रस्ता नोंदणीप्रमाणे नाहीच तर कोणाच्याही खासगी जमिनीत कारवाई करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नसल्याचा घरचा आहेर ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी दिला. अखेर सरपंच हळदणकर यांनी हा रस्ता गांवकर यांच्या जमिनीतून जात नसल्याचे पत्र देतो असे सांगत त्यांच्या जागेत झालेले अतिक्रमण काढून त्यांना पुन्हा कुंपण घालून देतो, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी काका चराटकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन पालव, माजी सरपंच बाळू मेस्त्री, विजय गांवकर, मनोहर गांवकर, सदानंद कोलगांवकर, गजानन गांवकर, मोहन पालव, संतोष मेस्त्री, आनंद चराटकर, राजन मुळीक, सचिन बोर्डेकर, हर्षदा गांवकर, दिनेश मुळीक, विशाखा गांवकर, सुभाष गांवकर, माया गांवकर, रसिका मुळीक, मीरा गांवकर, सागर मेस्त्री, आपा मेस्त्री, सागर गांवकर, अजय गांवकर, अशोक गांवकर, सुंदर गांवकर, नितीन मुळीक, बाबू राऊत, उदय मेस्त्री, सर्वेश मांजरेकर, संदेश पालव, गणपत गांवकर, कृष्णा गांवकर, विनय गांवकर, शुभम गांवकर, साईश नाईक, लक्ष्मण चराटकर, बाळा गांवकर, अजय गांवकर, आशिष गांवकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचे? चार दिवसांपासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या वादावर जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी इन्सुली येथे भेट दिली होती. यावेळी त्यांनी तुम्ही रस्ता करायला लागा, पुढे काय करायचे ते आम्ही बघतो असे सांगत गावात तणाव निर्माण केला. जर एखादा ग्रामस्थ विनाअट गावासाठी पायवाट देत असेल तर त्याचे कौतुक करायचे सोडून त्यालाच धमकावणे याला काय म्हणायचे? असा सवाल ग्रामस्थांनी करीत गावातील एका माणसासाठी जर जिल्हा परिषद अध्यक्षा गावातील वादाला खतपाणी घालत असतील तर त्यांनी आता येथे यावे. आम्ही त्यांना उत्तर देऊ असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.