शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

१३ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

By admin | Updated: March 4, 2015 23:39 IST

वित्त समिती सभा : सन २0१५-१६ चा आराखडा

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या सन २०१४-१५च्या सुधारीत अंदाजपत्रकात ५२ लाखाची वाढ करून २१ कोटी ६ लाखाच्या अंतिम सुधारीत अंदाजपत्रकाला तसेच सन २०१५-१६च्या १२ कोटी ९२ लाखाच्या मूळ अंदाजपत्रकाला बुधवारच्या वित्त समिती सभेत मंजुरी देण्यात आली.जिल्हा परिषद वित्त समितीची सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती संजय बोंबडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवळ, सुगंधा दळवी, सोनाली घाडीगावकर, समिती सचिव मारूती कांबळी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने सन २०१४-१५चे २० कोटी ५३ लाख ८८ हजार ७३० रूपयांचे सुधारीत अंदाजपत्रक तयार केले होते. त्यात ५२ लाख ७१ हजार २७० रूपयांची वाढ करून २१ कोटी ६ लाख ६० हजार २७० रूपयांची अंतिम सुधारीत अंदाजपत्रक तयार केले आहे. तसेच सन २०१५-१६ साठी १२ कोटी ९२ लाख ४४ हजार २०० रूपयांचे मूळ अंदाजपत्रक तयार केले. आजच्या वित्त समिती सभेत सन २०१४-१५च्या अंतिम सुधारीत अंदाजपत्रकाला व सन २०१५-१६च्या मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. हे अंदाजपत्रक अंतिम मान्यतेसाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आले असल्याची माहिती वित्त समिती सभापती संजय बोंबडी यांनी सभेत दिली.जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणारा निधी योग्य ती वित्तीय काळजी घेऊन १०० टक्के खर्च करा, असे आदेश सभापती संजय बोंबडी यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने दुग्ध व्यावसायिकांना ७५ टक्के अनुदानावर रबरी मॅट पुरविणे, दुधाची किटली पुरविणे, ५० टक्के अनुदानावर पंधरवड्यातील पिल्लांचा पाठपुरावा करणे, या तीन नवीन योजना राबविण्यासाठी वित्त समिती सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यापैकी रबरी मॅट व दुधाची किटली पुरविणे या दोन योजनांना यावेळी मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)अधिकाऱ्याला जबाबदार धरा : कांबळे१३ व्या वित्त आयोगासह सदस्य निधीतून सुचविलेल्या विकासकामांवर चार- चार महिने कोणतीच कार्यवाही होत नाही. मग निधी अखर्चित राहिल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सदस्यांनी विचारत जाब विचारला असता संबंधित कामाबाबत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरावे, अशी मागणी मागील सभेत करण्यात आली होती. त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या असल्याचे वित्त अधिकारी मारूती कांबळे यांनी सांगितले.