शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा सर्वाधिक फटका फलटणला

By admin | Updated: March 16, 2015 00:15 IST

शासकीय पंचनाम्यातून माहिती उघड : ८७८ शेतकऱ्यांचे झाले नुकसान

फलटण : जिल्ह्यात फेबु्रवारीच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला असल्याचे शासकीय पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे.  गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने एक हजार पस्तीस शेतकऱ्यांच्या १३३.८६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ५० टक्क््यांवर काढणीला आलेल्या गव्हाचे सर्वाधिक ७८.०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यानंतर रब्बी ज्वारीचे ४६.६२ हेक्टर बाधित झाले आहे. हरभऱ्याचे २.९४, फळांचे ४.३९, द्राक्षाचे १.८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक ८७८ शेतकऱ्यांचे १११.२० हेक्टर क्षेत्र, तर कऱ्हाड तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांचे २२.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सातारा, कोरेगाव, खटाव, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, माण तालुक्यांतही अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु या परिसरातील नुकसानीची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत असल्याने या शेतकऱ्यांना मदतीवाचून वंचित राहावे लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  यापूर्वीच्या शासनाच्या काळात कर्जमाफीमध्ये सरसकट शेतकरी पात्र ठरले होते. परंतु यंदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही, याची सांशकता आहे. १२०० शेतकऱ्यांची नावे सावकारांच्या कर्जमाफीसाठी कळविण्यात आली होती. असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या अहवालामध्ये नमुद आहे.  सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीचा दिलास दिल्यास शेतकरी वर्ग या धक्क्यातून सावरून आणखी झेप घेईल. फलटण तालुक्यामध्ये रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनाने केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसू नयेत, अशी शेतकऱ्यांची म्हणणे आहे. (वार्ताहर)वशीलेबाजीमुळे मदतीपासून वंचित..!सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पिकांचे नुकसान होत आहे. हाता तोंडाला आलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत नाहीशी होत असल्यामुळे शेतकरीवर्ग आणखीनच हतबल होत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते. परंतु ज्या शेतकऱ्यांचे ५० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनाच मिळते. या पेक्षा कमी नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या मदतीपासून हजारो शेतकरी वंचित राहतात. काहीवेळेला पंचनाम्यामध्ये वशीलेबाजी सुरू असते. आपल्या जवळच्या शेतकऱ्याचे किंवा नातलगाचे नाव यादीमध्ये घालतल्याची यापुर्वी अनेक किस्से घडले आहेत.