सातारा : सातारा जिल्ह्यातील काँग्रेसला बळकटीकरण करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करून कार्यकर्त्यांना ताकद देऊ, असे राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सातारा येथे सांगितले.
दहिवडी येथील अहिल्याबाई होळकर शेळीपालन संस्थेस भेट देण्यासाठी जात असताना ते सातारा विश्रामगृहावर थांबले होते, त्या वेळी काँग्रेस कार्यकत्यांनी त्यांचे स्वागत केले.
मंत्री सुनील केदार यांचे सातारा येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्वागत करताना जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अनु-जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष मनोजकुमार तपासे, प्रदेश प्रतिनिधी रणजित देशमुख, बाबासाहेब कदम, धनश्री महाडिक, अॅड. दत्तात्रय धनावडे, श्रीकांत चव्हाण, आनंद जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी केदार म्हणाले, सातारा जिल्हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जिल्हा आहे. त्यामुळे काँग्रेसला सहकार्य करून अधिक बळकट करू. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन विभागाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव यांनी जिल्हा काँग्रेस करीत असलेल्या कामाची माहिती दिली. सरचिटणीस नरेश देसाई यांनी काँग्रेसच्या कोविड मदत व साहाय्य केंद्राद्वारे केलेल्या कामाची माहिती या वेळी केदार यांना दिली.
फोटो ओळ : सातारा येथील विश्रामगृहावर दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी स्वागत केले.