शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

स्ट्रॉबेरीला हवामान पोषक; पण ‘अवकाळी’ घातक

By admin | Updated: January 2, 2015 00:07 IST

शेतकऱ्यांमध्ये चिंता : दहा वर्षांत पहिल्यांदाच वातावरणात बदल; नगदी पिकावर उत्पादकांचे बारकाईने लक्ष

सातारा : महाबळेश्वरची ओळख केवळ थंड हवेचं ठिकाण राहिली नसून ते एक ‘स्ट्रॉबेरी लँड’ म्हणूनही ओळखले जाते. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पीक. या फळासाठी येथील हवामान देखील अनुकूल आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे ‘स्ट्रॉबेरी’वर अवकाळी संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली असून, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शेतकरी पहिल्यांदाच हिवाळ्यात अशा प्रकारच्या वातावरणाचा अनुभव घेत आहेत.गेली कित्येक वर्षे येथील शेतकरी स्ट्रॉबेरीचा व्यवसाय करीत आहे. देशात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक ८७ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वरमधून घेतले जाते. आज महाबळेश्वर तालुक्यात ४० गावांतील सुमारे दीड ते दोन हजार शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करतात. स्ट्रॉबेरी या फळासाठी आवश्यक असणारी थंड हवा, लाल हलकी माती, समुद्र सपाटीपासून ४ हजार ३०० फूट उंची आदी गुणधर्म याठिकाणी आढळतात. यामुळे स्ट्रॉबेरी येथील मुख्य पीक आहे.‘स्ट्रॉबेरी’ हे थंड हवेत येणारे फळ आहे. मात्र, वातावरणात बदल झाल्यास याचा पिकावरही परिणाम होतो. सध्या वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे या पिकाला धोका निर्माण झाला आहे. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने व काही ठिकाणी रोपांवरील हिमकणांचे दवबिंदूत रूपांतर होत असल्याने पिके कुजण्याचे प्रकार घडत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ढगाळ वातावरणाबरोबरच पाऊस पडण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळ्यामध्ये गेल्या अनेक वर्षात प्रथमच अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वातावरणातील बदलाचे गणीत सुटेनामहाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दहा-पंधरा वर्षांत हिवाळ्यामध्ये पावसासारखी वातावरणनिर्मिती या अगोदर कधीच पाहावयास मिळाली नाही. स्ट्रॉबेरीसाठी थंड हवामान पोषक असल्यामुळे प्रामुख्याने हिवाळा ऋतूत येथे स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, सध्या वातावरणात होत असलेल्या ससतच्या बदलाचे गणित शेतकऱ्यांना देखील सुटेनासे झाले आहे. ‘अवकाळी पाऊस नको’ एवढीच इच्छा येथील शेतकरी व्यक्त करीत आहे.पाऊस पडला तर स्ट्रॉबेरीचे नुकसान होणार आहे. सध्या रोपांना फुले आली आहेत. पावसामुळे फुले झडून जातात. तर फळांवरही डाग पडतात. त्यामुळे उत्पादन घटते व मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. याबरोबरच बाजारपेठेतही स्ट्रॉबेरीची मागणी कमी होते.- श्रीपती भिलारेस्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, अवकाळी