वाई: चांदक (ता. वाई) येथे लोकांच्या सहभागातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनता कर्फ्यू मोहिमेअंतर्गत वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवून नियमांचे काटेकोर पालन करून वेळोवेळी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. चांदक गावात कोरोना विलगीकरण कक्षाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चांदक गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे, ही संकल्पना समोर ठेवून जनता हायस्कूल येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून स्वतंत्र खोल्यांमध्ये एकूण दहा खाटांचे विलगीकरण कक्ष ग्रामपंचायत मार्फत लोकसहभागातून उघडण्यात आले.
आमदार पाटील म्हणाले, ‘विलगीकरण कक्षात रुग्ण राहिल्यास होणारा संसर्ग टाळल्यास कोरोनाची रुग्णसंख्या घटविण्यात नक्कीच यश येईल.’
या वेळी माजी उपसभापती महादेव मस्कर, अनिल आबा जगताप, शशिकांत पवार, सरपंच सोनाली संकपाळ, उपसरपंच मोहन मोरे, ग्रामपंचायत सदस्य, गणेश संकपाळ, सोनाली जाधव, अंजना महामुनी, समिंद्रा खामकर उपस्थित होते. उद्योजक सुनील संकपाळ, संभाजी संकपाळ, आशिष संकपाळ, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष आशिष संकपाळ, सुनील दरेकर, तानाजी बापू, विश्वास भिलारे, शंकर भिलारे, युवा कार्यकर्ते मनीष भिलारे, नितीन संकपाळ, शुभम सावंत, अक्षय संकपाळ, वैद्यकीय अधिकारी ठोंबरे, संजय शिर्के, इतर ग्रामस्थ उपस्थित होते.