शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘त्या’ घेतात नोकरदार महिलांमधल्या ‘आई’चा शोध

By admin | Updated: March 31, 2016 00:12 IST

मोटार वाहन निरीक्षक नीता शिबे : घरासाठी, मुलांसाठी वेळ काढण्याचं महत्त्व सांगण्यासाठी व्याख्याने, चर्चासत्रांचा आधार

संजय पाटील-- कऱ्हाडबदल स्वीकारणं आणि आव्हानं पेलणं, हा प्रत्येक स्त्रिच्या ठायी असलेला उपजत गुण. या गुणांमुळेच स्त्री आयुष्याच्या प्रत्येक नव्या उंबरठ्यावर आपली वेगवेगळी भूमिका लिलया पार पाडते; पण नात्यांचा हा रंगमंच सजवताना प्रत्येक स्त्रीचा कस लागतो तो आईच्या भूमिकेत. सध्या कऱ्हाडच्या मोटार वाहन निरीक्षक नीता शिबे या प्रत्येक नोकरदार स्त्रिला तिची आईची भूमिका समजावून देण्याचा प्रयत्न करतायत. स्त्रिला तिच्या आईच्या भूमिकेत ‘रिटेक’ची संधी पुन्हा मिळतच नाही, असे त्या सांगतायत. ‘आई हे फक्त नाव नसतं, घरातल्या घरात गजबजलेलं गावं असतं’, असं कवी म्हणतात. कवींनी त्यांच्या कल्पकतेतून आईची महती वर्णीली आहे; पण सध्या घरातल्या घरात गजबजणार हे ‘गाव’ घरातच किती वेळं असतं? हा प्रश्न आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त किमान साठ टक्के महिला सध्या उंबरठ्याच्या बाहेर असतात. प्रत्येक नातं जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. धकाधकीचे आयुष्य गृहित धरून त्यावेळी अनेक नाती ‘अ‍ॅडजस्ट’ही होतात; पण आई आणि मुलाचं नातं ‘अ‍ॅडजस्ट’ कसं करायचं, हाच नीता शिबे यांना पडलेला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर शोधतानाच आईच्या भूमिकेचे वेगवेगळे पैलू त्यांच्यासमोर आले. आणि हेच पैलू त्यांनी नोकरदार महिलांसमोर मांडण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘प्रत्येकाच्या आयुष्यात आईला पहिला गुरू मानलं जातं. त्यामुळे मुलाला शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडे देण्याची पहिली जबाबदारी आईवर असते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी वेळ द्यावा लागतो. नोकरी सांभाळत हा वेळ देणे सहजशक्य नसले तरी मुलांच्या भविष्यासाठी आजचा तुमचा वेळ किती महत्त्वाचा आहे, हे पटवून देण्याचा नीता शिबे यांचा प्रयत्न आहे. लिखाण, व्याख्यान आणि चर्चेतूनही त्या त्यांची ही भूमिका सर्वांसमोर मांडतात. वास्तविक, नोकरदार महिलांची मुलांना सांभाळताना होणारी कसरत नीता यांनी त्यांच्याच घरी अनुभवली. नीता यांच्या आई वासंती या सरकारी सेवेत. त्यामुळे दहा ते पाचची ड्यूटी सांभाळत मुलांना वेळ देण्यासाठी होणारी आईची धडपड नीता यांनी जवळून अनुभवली. त्यासाठी आईला करावे लागणारे वेळेचे नियोजनही त्यांनी पाहिले. आईने दिलेला वेळ आणि त्यातून झालेल्या संस्कारामुळेच आज मी मानसिकरीत्या सक्षम झाले,’ असे नीता सांगतात. कौटुंबिक संवाद कमी झाला तर त्याचा सर्वात जास्त परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. घराला घरपण उरत नाही. त्यामुळे हे टाळण्यासाठी नोकरदार महिलांनी वेळेचे नियोजन करून कौटुंबिक वातावरण हसतखेळत ठेवावे, असे नीता शिबे सांगतात. तसेच मुलांना सर्व बाजूंनी सक्षम करण्याची ताकद आईमध्ये असल्याने नोकरी सांभाळतानाच मुलांच्या मानसिक भरण, पोषणाकडेही लक्ष दिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. अधिव्याख्याता ते वाहन निरीक्षक; तेरा वर्षांचा प्रवासनीता शिबे या मूळच्या कागलच्या. वडील मुख्याध्यापक तर आई शासकीय नोकरीत. मुंबईत बीई (मेकॅनिकल) पदवी मिळविल्यानंतर नीता यांनी तीन वर्षे अधिव्याख्याता म्हणून नोकरीही केली. २००३ मध्ये राज्यसेवा परीक्षेत मिळविलेल्या यशानंतर सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. २००५ ते २००८ पर्यंत त्या बारामतीत नेमणुकीस होत्या. त्याचवेळी त्यांना पदोन्नती मिळाली. त्यानंतर मुंबई, कोल्हापूर येथे त्यांनी काम पाहिले. २०१५ मध्ये त्यांची कऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. वाहन हा नीता यांच्या कामाचा भाग असला तरी दुचाकीपासून सोळा टायरच्या कंटेनरपर्यंतची सर्व वाहने त्या चालवितात, हे विशेष.