शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सातारची ‘डीबी’ बनतेय हप्ता वसुलीचे केंद्र !

By admin | Updated: May 27, 2014 23:12 IST

कर्मचार्‍यापाठोपाठ म्होरक्याही सापडला : हिमनगाचे टोक मात्र अद्याप कोसो दूर

 सातारा : शहर पोलीस ठाण्याचा कणा म्हणून समजल्या जाणार्‍या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डीबी) एक-एक भानगडी आता उघड होऊ लागल्या आहेत. केवळ हप्ता वसुलीमध्येच समाधान मानणार्‍या या ‘डीबी’चा खरा चेहरा समाजासमोर उघड झालायं. घरफोडी जबरी चोरी या प्रकरणातील आरोपींशी आर्थिक हितसंबंध ठेवणार्‍या ‘डीबी’चाच कर्मचारी नितीन निकमला कालच एसपींनी निलंबीत केल्याची घटना ताजी असतानाच दुसर्‍या दिवशी ‘डीबी’चा मोºहक्या गोरख दरेकरची हप्ता वसुली समोर आली. विशेष म्हणजे ‘डीबी’मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना केवळ गुन्हे उघडकीस आणण्याचेच काम असते. परंतु बोटावर मोजण्याइतपही या विभागाने आत्तापर्यंत गुन्हे उघडकीस आणले नाहीत. ‘डीबी’मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे नेटवर्क चांगले लागते. त्यामुळे असे नेटवर्क आणि कौशल्य असणारेच अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा ‘डीबी’मध्ये समावेश केला जातो. यापूर्वी ‘डीबी’ची समाधानकारक कामगिरी कधीच झाली नाही. या उलट सतत उपद्रवमुल्य काम असल्यामुळे अनेकदा टीमचा मोºहक्या फार काळ टिकू शकत नव्हता. एखादा आरोपी सापडल्यानंतर त्याच्याशी हातमिळवणी करून आर्थिक तडजोडी ेकरण्यातच डीबीचा वेळ जायचा. शहरात अनेक अवैद्य व्यवसाय सुरू आहेत. या माध्यमातून हीच टीम हप्ता वसुलीसाठी पुढे असायची. विशेषत: लपून-छपून गुटखा विकणार्‍यांवर या टीमची विशेष मेहरनजर असायची. केवळ ‘तोडपाणी’ हाच या ‘डीबी’चा ‘उद्योग’ बनला होता. शहर पोलीस ठाण्याचा नव्याने कारभार हातात घेतलेले पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांच्याही या डीबीच्या उचापती काही दिवसांतच लक्षात आल्या. त्यामुळे त्यांनी केवळ हप्ता वसुलीला महत्त्व आणि कामाशीवाय पोपटपंची करणार्‍या कर्मचार्‍यांना ‘डीबी’मधून बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र तरीही यातील एक टोक त्यांनी साफ केले. पंरतु अद्याप या टीममध्ये अस्तनीतील निखारे असल्याचे या कारवाईतून समोर आले. ‘डीबी’ची मदार टीमच्या मोºहक्यावर अवलंबून असते. हाच मोहरक्या जर अशा तोडपाणीला महत्त्व देत असेल तर त्याच्या हाताखालच्या कर्मचार्‍यांनी कोणता आर्दश घ्यायचा. गोरख देरकर यांना मानणारा पोलीस दलात एक वर्ग होता. त्यांचा शांत स्वभाव आणि कामाची होताटी चांगली असल्यामुळे त्यांच्याकडे वरिष्ठांनी ‘डीबी’चा कार्यभार सोपविला होता. मात्र त्यांचा हप्ता वसुलीमध्ये हातखंडा होता, हे कोणालाच माहिती नाही म्हणे. पण त्यांच्यावर ‘एसीबी’ने कारवाई केल्यानंतर त्यांच्या एक-एक सरस कथा समोर येऊ लागल्या. रोज एक तरी ‘बकरा’ सापडलाच पाहिजे, अशी ते कर्मचार्‍यांकडे आरोळी ठोकत. जर कोणी मिळालाच नाही तर जुना-पुरान्या आरोपीला चौकशीसाठी बोलावून आपले इस्पीत साध्या करत होते. (प्रतिनिधी) बरखास्तीच्या मार्गावर ! नेहमी साध्या वेशात रुबाबात फिरणार्‍या ‘डीबी’ला युनीफॉर्ममधून सुट असते. याचाच अनेकांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. साध्या वेशामध्ये समाजात फिरायचे. एखाद्याचे पर्सनल बोलणे एकल्यानंतर ‘त्याला मी पोलीस आहे, आता मला सर्व समजले आहे, तुला आत टाकीन,’ अशी धमकी देवून या टीममधील काही अस्तनीतील निखार्‍यांनी हप्ता वसुली सुरू केली होती. अनेक तक्रारदार भितीपोटी आणि इज्जतीसाठी मुग गिळून गप्प बसले. याचाच या ‘डीबी’ने अनेकदा गैरफायदा घेतला. कधी ना कधी या या ‘डीबी’चे बिंग बाहेर पडणारच होते, असे खुद्द आता पोलीसच बोलू लागले आहेत. त्यामुळे ही ‘डीबी’ आता बरखास्तीच्या मार्गावर आहे.