लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के असे गुणदान विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. अकरावीकडे बहुतांश विद्यार्थ्यांनी रेस्ट इयर म्हणून बघितल्याने यंदा विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शिक्षक मात्र विद्यार्थ्यांना काळजी न करण्याचा सल्ला देत आहेत.
बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाच्या दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचा आमच्या गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. या फॉर्म्युल्यानुसार अकरावी विद्यार्थ्यांचा घात करेल असे त्यांना वाटते आहे. शैक्षणिक तज्ज्ञांच्या मतेही विज्ञानाचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर म्हणून बघतात. त्यांना अकरावीच्या निकालाचे फार महत्त्व नसते. त्यामुळे गुण कमी होतात, पण कोरोनामुळे बोर्डाने घेतलेला निर्णय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मान्य करावा लागत आहे. बारावीचेही कोरोनामुळे वर्ग झालेले नाहीत. ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांची यामुळे अडचण होणार आहे, विद्यार्थ्यांत भीती आहे, पण अकरावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काळजी न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
कोट
शिक्षक काय म्हणतात
फॉर्म्युल्यानुसार दहावीतील बेस्ट ऑफ ३ ची सरासरी घ्यायला सांगितली. त्यानुसार दहावीत ज्या मुलाला ६० टक्के असेल आणि ३ विषयांत चांगले गुण असतील, तर त्याच्या गुणांच्या सरासरी आधारावर बारावीचे मूल्यांकन करायचे आहे. त्यामुळे बारावीत विद्यार्थ्यांचे गुण कमी न होता वाढणार आहेत.
- विशाल ढाणे, खासगी क्लास चालक.
बहुतांश विद्यार्थी अकरावीला रेस्ट म्हणून बघतात, पण कोरोनाने विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. मंडळाने दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार अकरावीच्या गुणालाही महत्त्व आले आहे. विद्यार्थी नापास होणार नाही, पण अकरावीच्या गुणांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर काहीसा परिणाम होईल.
- प्रा. डॉ. चंद्रकांत माने, पाटण.
विद्यार्थी काय म्हणतात
आमच्या दृष्टिकोनातून बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीची तयारी सुरू होते. त्यासाठी नाही म्हटलं तरी अकरावीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा परिणाम गुणांवरही होतो, पण बारावीत विद्यार्थी कसून मेहनत घेतो, अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे, पण बोर्डाने दिलेल्या फॉर्म्युलामुळे आमचे नुकसान होणार अशी भीती वाटते.
-
कोरोनामुळे परीक्षा झाली नाही. हे विद्यार्थीहिताचे आहे. दहावीला चांगले गुण होते. मात्र, अकरावीकडे बारावीच्या तयारीत दुर्लक्ष केले. दहावीच्या गुणांना थोडे अधिक महत्त्व देत त्याचे ५० टक्के गुण घेणे आवश्यक होते. त्यामुळे टक्केवारी घसरण्याची भीती राहिली नसती, पण सीईटीची संधी असल्याने पुढील परीक्षांच्या अभ्यासाची तयारी करणे आमच्या हातात आहे, ते आम्ही करू.
-
जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी
सीबीएसई -
मुले :
मुली :
स्टेट बोर्ड
मुले :
मुली :