शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

प्रवीण पाटलांवर आगपाखड

By admin | Updated: July 4, 2014 00:26 IST

पालिका सभा : रवींद्र पवार, दत्ता बनकरांसह जयेंद्र चव्हाण यांनी केले लक्ष्य

सातारा : सभेआधी दोन्ही आघाड्यांच्या चर्चेत जे मुद्दे मांडायचे ते भर सभेत मांडणाऱ्या नगरसेवक प्रवीण पाटील यांच्यावर दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी चांगलीच आगपाखड केली. रवींद्र पवारांनी तर त्यांना स्वीकृत नाही तर ‘विकृत नगरसेवक’ असे संबोधून सभेत बॉम्बच टाकला. तुमचा अभ्यास केवळ प्रसिध्दीसाठी न वापरता पालिकेच्या फायद्यासाठी वापरा, असा नमुनेदार सल्लाही जयेंद्र चव्हाण, अ‍ॅड. दत्ता बनकर व रवींद्र पवार यांनी पाटील यांना दिला. सभेने माजगावकर माळावर अद्ययावत फिश मार्केटसह ४६ विषयांना मंजुरी दिली.आचारसंहितेच्या चक्रव्यूहात अडकलेली पालिकेची सर्वसाधारण सभा तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर गुरुवारी (दि. ३) नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात झाली. पर्यावरण संरक्षण करणाऱ्या हरित इमारतीबाबत कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेण्याच्या विषयाबाबत माहिती देण्यासाठी नगरसेवक प्रवीण पाटील उठले. त्याचवेळी रवींद्र पवार, जयेंद्र चव्हाण व अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी त्यांना विरोध केला. ‘तुम्ही फक्त बोलता, प्रसिद्धीसाठी हे सगळं करताय का? सभेआधी दोन्ही आघाड्यांच्या बैठका होतात. त्यामध्येच बरेचसे धोरणात्मक निर्णय होतात. मात्र, तिथे पाटील आपले मत मांडत नाहीत. वास्तविक त्यांनी तिथेच मते व्यक्त करावीत. सभेचा वेळ वाया घालवू नये,’ असे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, फिश मार्केट बांधण्याच्या विषयाची माहिती देताना पाटील यांनी दहा गुंठ्यांत कोल्ड स्टोअरेजची सुविधा असणारे अद्ययावत फिश मार्केट बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा जयेंद्र चव्हाण यांनी कोल्ड स्टोरेजसाठी किती तरतूद केली आहे? केवळ दिशाभूल करण्यासाठी काहीही माहिती देऊ नका, असे स्पष्ट केले. रवींद्र पवार यांनीही दिवसातले दोन तास पाटील पालिकेत असतात. या कालावधीत ते माहिती घेतात. ते बी.ई. इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा पालिकेला झाला. मात्र, त्यांनी ज्ञानाचा फायदा पालिका प्रशासनाला करून द्यावा. इलेक्ट्रिकल संदर्भातील विषय प्रशासनाने पाटलांना दाखवूनच घ्यावेत, अशी कोपरखळी मारली. कचराकुंड्या खरेदीसंदर्भात जयेंद्र चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. आपले शहर कचराकुंड्यामुक्त आहे. आता पुन्हा शहरात कुंड्यांची संख्या वाढवून शहराला बकाल केले जाणार आहे का, असा प्रश्न त्यांनी मांडला. त्यावर आरोग्य सभापती रवींद्र झुटिंग यांनी खुलासा करताना पूर्वीच्या कचरा कुंड्यांच्या दुरुस्तीसाठी ४० हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच पालिकेचा कॉम्पॅक्टर एकावेळी १५ कुंड्यांतील कचरा रोज उचलतो. पूर्वी ९० कुंड्या होत्या. नवीन कुंड्या घेण्यामागे व्यक्तीश: कोणताही हेतू नाही. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे. स्थायी समितीनेही याला मंजुरी दिली असल्याचे सांगितल्यानंतर हा विषय मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)