शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

माल खरेदीचे बिल ४५ दिवसात भरा, अन्यथा तिप्पट व्याज द्या

By प्रगती पाटील | Updated: February 7, 2024 15:10 IST

कायद्याच्या कडक अंमलबजावणीमुळे व्यापाऱ्यांची धावाधाव सुरू

सातारा : सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्रोत्साहनासह बळकटी द्यायला व त्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी मायक्रो स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस डेव्हलपमेंट अधिनियम २००६ मध्ये अस्तित्वात आले. यातील कलम ४३ ब नुसार ४५ दिवसांच्या आत माल खरेदी केल्याचे बिल अदा न केल्यास त्यावर दुप्पट तिप्पट दराने व्याज आकारण्यासह अतिरिक्त आयकर भरण्याची ही वेळ मोठ्या उद्योगांवर येणार आहे. या कायद्याच्या कडक अंमलबजावणीमुळे सध्या व्यापाऱ्यांची धावाधाव सुरू आहे. केंद्र शासनाने नवीन सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम विकास अधिनियम २००६ ची अंमलबजावणी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने यासंदर्भात अधिसूचित द्वारे या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. नवीन कायद्यानुसार सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना उद्योग ऐवजी उपक्रम असे संबोधण्यात येत आहे. उत्पादन करणाऱ्या व सेवा पुरवणाऱ्या उपक्रमांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील सहा महसुली विभागांसाठी सूक्ष्म व लघु उपक्रमाने दुसऱ्या घटकास विक्री केलेल्या वस्तूंच्या किंवा पुरविलेल्या सेवेच्या थकीत देय रकमेच्या वसुलीसाठी संबंधित विभागाच्या उद्योग सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात एकूण सात सूक्ष्म व लघु उपक्रमासाठी परिषदेची स्थापना करण्यात आली. या द्वारे  थकीत देयक रक्कम वसुलीवर करडी नजर राहणार आहे. 31 मार्च च्या आधी ही सर्व थकीत देयके देण्याची अंतिम मुदत असल्याने व्यावसायिक व व्यापाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

कायद्याने याला म्हणतात मायक्रो इंटरप्राईजमायक्रो, स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस डेव्हलपमेंट ॲक्ट अंतर्गत एखाद्या व्यवसायातील गुंतवणूक, मशिनरी यांची किंमत एक कोटींपेक्षा जास्त असू नये. या व्यवस्थापनाची वार्षिक उलाढाल पाच कोटींपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

स्मॉल एंटरप्राइजज्या कंपनीची किंवा व्यवस्थापनाची गुंतवणूक दहा कोटीच्या आत आणि वार्षिक उलाढाल पन्नास कोटी रुपयांच्या आत आहे अशा व्यवस्थापनांना स्मॉल एंटरप्राइजेस असे कायद्याच्या भाषेत संबोधण्यात आले आहे

उंतपांचछोट्या उद्योग व्यावसायिकांकडून साहित्य खरेदी केल्यानंतर त्यांना बिल देताना मोठ्या व्यवस्थापनांकडून टंगळमंगळ केली जायची. अनेकदा बिल वेळेत न मिळाल्याने किंवा थकबाकी वाढल्याने हे व्यवसाय अक्षरशः अडचणीत घेऊन बंदही पडतात. याचा फटका सर्रास व्यावसायिकांना बसतो हे लक्षात घेऊन आयकर मध्ये सेक्शन ४३ B (h) हा अस्तित्वात आला. परिणामी ज्या खरेदीची देयक दिले नाही ती खरेदी रक्कम उत्पन्नातून वजावट मिळणार नाही. त्यामुळे आयकराचा मोठा फटका बसणार आहे. उद्यम आधारवर नोंदणी सक्तीची! एमएसएमईडी अंतर्गत त्यांनी उद्यम आधारवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. यात अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ऑफिसचा पत्ता, सोशल कॅटेगिरी, पॅन कार्ड, बँक अकाउंट, व्यवसाय सुरू केल्याची तारीख, व्यवसायाचे स्वरूप, मुख्य व्यवसाय, कर्मचाऱ्यांची संख्या, जागा, मशीन यामधील गुंतवणूक आदींचा तपशील भरणे आवश्यक आहे. उद्यम वर नोंदणी असल्याशिवाय हा कायदा सूक्ष्म उद्योजकांना लागू होत नाही.

छोट्या उद्योजकांकडून केलेल्या खरेदीचे देयक देण्यासाठी मुदतीचे बंधन घातले आहे. त्यानुसार खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात देयकाची मुदत ठरली नसेल तर १५ दिवसांच्या आत देयके देणे बधनकारक आहे. कोणत्याही परिसथितीमध्ये ४५ दिवसांच्या नंतर उत्पन्नाच्या वजावटीचा लाभ मिळणार नाही. यापूर्वी शिल्लक असलेल्या देयकांची देणी देण्यासाठी आता ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे ३१ मार्च च्या आधी ही सर्व देयके पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. - प्रफुल्ल शहा, सीए सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर