शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आमदारांवर खासदारकीचं गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:42 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे रण पेटले असूून, माढ्यात ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे रण पेटले असूून, माढ्यात काटे की टक्कर तर साताऱ्यात चुरस निर्माण झाली आहे. यामुळे ज्या-त्या विधानसभा मतदार संघातील आमदारांवरच सर्वच उमेदवारांची बेरीज-वजाबाकी ठरणार आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे यांच्याबरोबर पक्ष व आघाडीचे आमदार दिसत असून, माढ्यात मात्र माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या भूमिकेवर सर्व चित्र अवलंबून आहे.२००९ च्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनुसार साताºयातील माण-खटाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघ माढ्याला जोडण्यात आला. सातारा लोकसभेसाठी सातारा-जावळी, वाई-महाबळेश्वर-खंडाळा, कºहाड दक्षिण, कºहाड उत्तर, पाटण आणि कोरेगाव असे विधानसभेचे मतदारसंघ आहेत. सातारा, वाई, कºहाड उत्तर आणि कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार तर पाटणला शिवसेना व कºहाड दक्षिणचे नेतृत्व काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतात. आघाडी धर्मानुसार पाच ठिकाणच्या आमदारांची ताकद राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मिळायला पाहिजे. पण, अजूनही ताकद लागल्याचे दिसत नाही.साताºयात उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे आता एकत्र आहेत; पण शिवेंद्रसिंहराजेंचे कार्यकर्ते सद्य:स्थितीत काठावरच आहेत. सेनापतींचा प्रचारात सहभाग वाढत असलातरी सैन्य मात्र अजून बघ्याच्या भूमिकेत आहे. तर मतदार संघात दोन्ही राजेंचे वर्चस्व आहे. जावळीत शिवेंद्रसिंहराजेंना मानणारा वर्ग अधिक आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या आदेशावरच कार्यकर्त्यांची लढाई असणार आहे. कोरेगावचे आमदार आणि उदयनराजेंचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या निवडणुकीत पहिल्यापासून ते उदयनराजेंसोबत आहेत. त्यामुळे उदयनराजेंची वाट त्यांच्याकडून सुकर आहे. वाईचे आमदार मकरंद पाटील असून, त्यांचे व उदयनराजेंचे संबंध सौहार्दपूर्णच राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून पाटील हे उदयनराजेंसाठी शक्ती पणाला लावत आहेत.कºहाड दक्षिणचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतात. ते आघाडी धर्म म्हणून उदयनराजेंबरोबरच आहेत. तर कºहाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे उदयनराजेंबरोबर आहेत. दोघांचे फारसे सख्य नसलेतरी पक्षाचा उमेदवार म्हणून व आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून पाटील यांना उदयनराजेंचेच काम करावे लागणार आहे.पाटणचे आमदार शंभूराज देसाई आणि उदयनराजेंचे मैत्रीपूर्ण संबंध असलेतरी पक्षाचाच उमेदवार आता आहे. त्यातच सेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे पाटण तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा विनासंकट पार पडावी, यासाठी देसाई यांना नरेंद्र पाटलांसाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. जयकुमार गोरे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंना मदत करतो पण, माढाबाबत निर्णय झालेला नाही अशी भूमिका घेतल्याने ते काय निर्णय घेणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे.गोरे उदयनराजेंच्या प्रचारात...फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे राष्ट्रवादीचे आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या बरोबरीने ते माढा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासाठीच मैदानात उतरतील. खरा प्रश्न माणचे आमदार जयकुमार गोरेंचा आहे. माढा मतदारसंघाबाबत गोरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, सातारा लोकसभा मतदार संघात ते उदयनराजेंच्या प्रचारासाठी उतरले आहेत. राष्ट्रवादीपेक्षा उदयनराजेंशी असलेले मित्रत्वाचे नाते त्यांनी येथे समोर ठेवले आहे.