शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अनोळखी वाहनात बसणं ठरू लागलंय धोकादायक

By admin | Updated: July 4, 2014 00:25 IST

अडीअडचणीची वेळ पडतेय महागात : चार वर्षांत ४३ जणांना लुटले

सातारा : रात्री-अपरात्री एखादे वाहन मिळाले नाही की अनेक प्रवासी रस्त्यावरून धावणाऱ्या अनोळखी वाहनांना हात करून आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनोळखी वाहनात बसलेल्या चालक आणि इतर लोकांकडून धोका होऊ शकतो, हे माहीत असूनही अनेक प्रवासी अशा वाहनांत बसतात. परिणामी निर्जन ठिकाणी गाडी थांबवून अशा प्रवाशांकडून ऐवज लुटला जातो. गेल्या चार वर्षांत सातारा जिल्ह्यात अशा प्रकारच्या ४३ घटना घडल्या असल्याची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.वडिलांसमवेत मुंबईला निघालेल्या अल्पवयीन मुलीला एका जीपचालकाने गाडीत बसवून भुर्इंजपर्यंत नेले. त्यानंतर त्याने निर्जन ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार केला. सध्या संबंधित नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अशा प्रकारच्या वाढत्या घटना प्रवाशांसाठी चिंताजनक ठरत आहेत. यापार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहिली असता तब्बल ४३ घटना घडल्या असल्याचे समोर आले. प्रवासासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्ती अनेकदा एसटीची वाट न पाहता महामार्गावर उभे राहून खासगी अनोळखी वाहनांना हात करत असतात. अशा वेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला चालक व त्यामधील प्रवासी महामार्गावर उभ्या असलेल्या प्रवाशाला हेरून गाडीत घेतात. गाडी काही अंतर पुढे गेल्यानंतर निर्जन ठिकाणी गाडी थांबवून वेळ पडल्यास प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील ऐवज लुटला जातो. अंधार असल्यामुळे अनेकदा पीडित प्रवाशाला गाडी नंबर दिसत नसतो. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन असे लूटमार करणारे लोक पसार होतात. ४३ घटनांपैकी केवळ १९ घटना उघडकीस आल्या आहेत. यावरूनच असे लूटमार करणारे आरोपी कसे मोकाट आहेत, हे दिसून येते. त्यामुळे अवैध खासगी वाहतूक टाळायलाच हवी. मंगळवारी घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महामार्गावर अवैध वाहनातून प्रवास करणे खरोखरच नागरिकांनी टाळायला हवे, हे प्रत्येकाने मनोमन पटवून घेतले पाहिजे. कितीही घाईगडबड असली तरी एसटीनेच प्रवास करायचा, असा ठाम निर्णय घेऊनच प्रवासाठी बाहेर पडावे, असे प्रकार टाळण्यासाठी प्रवाशांनी स्वत: खबरदारी घेतली तर अशा लूटमारीच्या घटनांपासून आपण वाचू शकतो, याची जाणीव व्हायला हवी. (प्रतिनिधी)