शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

मधमाश्यांच्या उपद्रवामुळे शाळेला सुटी

By admin | Updated: July 4, 2014 23:47 IST

आगाशिवनगर येथील प्रकार : दोन दिवस शैक्षणिक कामबंद

मलकापूर : आगाशिवनगर येथील शाळेच्या इमारतीत मधमाश्यांनी पोळे तयार केल्यामुळे व मधमाश्यांचा उपद्रव वाढल्यामुळे शाळेला दोन दिवस सुटी देण्यात आली. रात्रीच्या वेळी धूर करून मधमाश्यांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तिसऱ्या दिवशीही माश्या शाळेच्या परिसरातच घोंगावत होत्या. आगाशिवनगर येथे लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाची ए वन बालवाडी व नूतन मराठी शाळा आहे. सहाशे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शाळेची तीन मजली इमारत असून, उन्हाळ्याच्या सुटीत वर्दळ नसल्यामुळे या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मधमाश्यांचे मोहोळ बसले होते. दुसऱ्या मजल्यावर पोर्चच्या छतालाच मोहोळ असल्याने शाळा व्यवस्थापनाची मोठी पंचाईत झाली. अशातच १६ जूनपासून शाळा सुरू झाली. मात्र, शिक्षकांसह शाळा प्रशासनाने मधमाश्यांच्या मोहोळाचे गांभीर्य ओळखून सुरुवातीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाणे टाळले. दिवसभरात विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीही दुसऱ्या मजल्याकडे फिरकत नव्हते. अखेर मधमाश्यांचा वावर व उपद्रव वाढल्यामुळे मधमाश्यांना तेथुन हुसकावण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवार, दि. ३० त्यासाठी शाळेला सुटी देण्यात आली. सोमवारी रात्री धूर करून माश्यांना हुसकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, रात्रीच्या वेळी सर्व माशा शाळेच्या ग्राऊंडवरच पडल्या. त्या माश्यांचा ढीग मंगळवारी दुसऱ्या दिवशीही तसाच राहिल्याने शाळा बंद ठेवण्यात आली. तसेच दुसऱ्या मजल्यात मोहोळावरही काही माश्या घोंगावत होत्या. बुधवारी माश्यांचा उपद्रव कमी झाल्यामुळे शाळेचे दैनंदिन कामही सुरू करण्यात आले. गुरुवारी दुसऱ्या मजल्यावरील मोहोळही शाळा प्रशासनाने काढून टाकले. (प्रतिनिधी)