शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हायवेवर होतेय वाऱ्याशी स्पर्धा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:11 IST

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : महामार्ग आता सहापदरी होतोय, त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग वाढतोय; पण या ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : महामार्ग आता सहापदरी होतोय, त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग वाढतोय; पण या वाढत्या वेगामुळे अपघाताचे प्रमाणही वाढतंय़ शेंद्रे ते पेठनाका या ८७ किलोमीटरच्या पट्ट्यात गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल ८०९ अपघात झालेत़ त्यामध्ये १२५ जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर ८५६ जण जायबंदी झालेत़स्टेअरिंगवर हात, अ‍ॅक्सिलेटरवर टाच, डोळ्यावर गॉगल अन् बंद काचा़ ‘स्पीडॅमीटर’चा काटा क्षणाक्षणाला पुढे सरकतो़ १००़़़ ११०़़़ १२० ़़़ तर कधी त्याही पुढे; पण जोपर्यंत अडथळा येत नाही, तोपर्यंत चालकाची ‘अ‍ॅक्सिलेटर’वरची टाच हटत नाही़ लक्ष कुठंही असलं तरी गाडीचा वेग मात्र वाढतच असतो़ बंद काचांमुळे वेगाची जाणीव होत नाही अन् ज्यावेळी जाणीव होते, त्यावेळी वाहनावर चालकाचा ताबा राहत नाही़ शेंद्रे ते पेठनाकादरम्यान चालकाचा ताबा सुटल्यानेच अनेक वाहने अपघातग्रस्त झाली आहेत़ त्यामध्ये काही वाहनांचा तर अक्षरश: चक्काचूर झालाय.वास्तविक, महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कोल्हापूर ते सातारा व सातारा ते कोल्हापूर या दोन्ही लेनवर एकेरी वाहतूक आहे. त्यामुळे समोरून येणाºया वाहनाला धडक बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, तरीही इतर राज्यमार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावरच जास्त आणि भयानक अपघात होतात. अनियंत्रित वेग, मोठ्या आवाजात लावली जाणारी म्युझिक सिस्टीम, चुकीच्या पद्धतीने होणारा ओव्हरटेकचा प्रयत्न, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सहप्रवाशाशी बोलणे, विश्रांती न घेता तासन्तास वाहन चालविणे, चालकाचे मद्यप्राशन आदी कारणे अपघाताला निमंत्रण देतात.शेंद्रे ते पेठनाकादरम्यान वारंवार भयानक अपघात होतायत. चालकांनी सावधानता बाळगावी, यासाठी ठिकठिकाणी फलकही लावले गेलेत. मात्र, या फलकांकडे कोणताही चालक म्हणावे तेवढे लक्ष देत नाही, त्यामुळे अडथळ्याची अथवा धोक्याची पूर्वसूचना चालकाला मिळत नाही. परिणामी, ऐनवेळी समोर आलेला अडथळा किंवा धोका टाळण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून वाहने अपघातग्रस्त होतात. बहुतांश अपघातांत चालकाचा बेदरकारपणा प्रवाशांच्या जीवावर बेततो. रस्त्याकडेला थांबलेल्या वाहनाला चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुसºया वाहनाची धडक बसते. वाहन नियंत्रित न झाल्यानेच हे अपघात घडतात. गत काही वर्षात झालेल्या अपघातांचा विचार करता बहुतांश अपघात बेजबाबदार चालकांमुळे झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.‘स्पीडगन’ कहाँ है?महामार्गावर प्रतितास जास्तीत जास्त ८० पर्यंतचा वेग निर्धारित करण्यात आला आहे़ धावत्या वाहनांच्या वेगाची तपासणी करण्यासाठी महामार्ग पोलिसांना ‘स्पीडगन’ही पुरविण्यात आल्या आहेत़ मात्र, त्या ‘स्पीडगन’चा वापरच होत नसल्याची परिस्थिती आहे. वेगमर्यादा ओलांडल्याने होणारी कारवाई नगण्य असल्यामुळे वेगाच्या मर्यादेचे भान चालकांना राहत नाही. परिणामी, अनेकवेळा अपघाताचा सामना करावा लागतो.