शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अपंग विभागाला शाळेच्या कर्मचाऱ्यांची ‘कुबडी’!

By admin | Updated: October 15, 2015 00:27 IST

जिल्हा परिषद : पदे रिक्त; कामासाठी आठवड्याचे वेळापत्रक दिले ठरवून

नितीन काळेल - सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत अपंग व्यक्तीसाठी राबविण्यास येणाऱ्या योजना कार्यालयात काही जागा गेल्या काही वर्षांपासून भरलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील अपंग शाळांतील कर्मचाऱ्यांना येथे येऊन काम करावे लागत आहे. विशेष म्हणजे, आठवड्यातून वेळापत्रकाप्रमाणे संबंधित शाळांचे कर्मचारी सातारा येथे येत असतात. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. अपंग कार्यालयांतर्गत शिष्यवृत्ती योजना, अपंग शाळांचे पगार, अपंग शाळांना मान्यता आदी. विशेष म्हणजे, या विभागाच्या वतीने अपंग व्यक्तींना ओळखपत्र देण्यात येते. या ओळखपत्रावरच अपंग व्यक्तींना राज्य परिवहन महामंडळाच्या तिकिटामध्ये ७५ टक्के सवलत मिळत असते. तसेच बीज भांडवल योजना आहे. सुशिक्षित तसेच अशिक्षित बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बीज भांडवल योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय, धंदा, उद्योग, शेतीपूरक उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे अर्थसहाय राष्ट्रीय बँकांमार्फत परतफेडीच्या कर्जाच्या स्वरूपात वा अनुदानाच्या स्वरूपात दुरावा रक्कम अशी एकत्रित या विभागामार्फत देण्याची योजना आहे. या योजनेखालील अपंग व्यक्तींना प्रकल्प खर्चाच्या वीस टक्के अथवा कमाल पाच हजार रुपये बीज भांडवल अनुदान स्वरूपात देण्यात येते. उर्वरित ८० टक्के भाग बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होते. तसेच शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय देण्यात येते. अपंग व्यक्तींना गरजेनुसार कृत्रिम साधने, अवयव, तीनचाकी सायकल, श्रवणयंत्रे देण्याची योजना आहे. पूर्णत: अंध व्यक्तींना टेपरेकॉर्डर व कॅसेटस पुरविण्यात येते. अशा विविध योजना या विभागाकडून राबविण्यात येतात; पण याच विभागाला सध्या दुसऱ्याचा टेकू घ्यावा लागत आहे. सध्या या विभागात वैद्यकीय, सामाजिक कार्यकर्त्या हे पद कार्यरत आहे. अनुराधा कानडे या येथील काम पाहत आहेत. पण, सहायक सल्लागार आणि वरिष्ठ लिपिक हे पद गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अपंगांची कामे करताना अनेक अडचणी येत आहेत. कर्मचारी कमी असल्याने अनेकवेळा अपंग व्यक्तींना माघारी जावे लागत आहे. सध्या येथील काम हे जिल्ह्यातील अपंग शाळांतील कर्मचारी येऊन करीत आहेत. जिल्ह्यात अनुदानित अपंग शाळा ११ असून, विनाअनुदानीतही ११ आहेत. या शाळांतील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ठराविक वार ठरवून दिलेले आहेत. त्यादिवशी संबंधित शाळेतील कर्मचारी येऊन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात काम करीत असतात. त्यामुळे रिक्त जागा न भरल्याने समाजकल्याण विभागाला अपंग शाळांच्या कर्मचाऱ्यांचा ‘कुबडी’ म्हणूनच वापर करावा लागत असल्याचे दिसत आहे.अशा योजना राबविल्या जातात...अपंग व्यक्तींना ओळखपत्रव्यवसाय, उद्यागांसाठी बीज भांडवल योजना अंध: विद्यार्थ्यांसाठी टेपरेकॉर्डर, कॅसेटस पुरविणे योजना अपंगांना गरजेनुसार कृत्रिम साधने, अवयव, तीनचाकी सायकल, श्रवण यंत्रणे देण्याची योजना अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती४ अपंग शाळांचे पगार ४ अपंग शाळांना मान्यता सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत अपंग कार्यालयातील एक जागा रिक्त आहे, अशी माहिती आहे. यासाठी राज्यशासनाने मान्यता दिल्यास ती जागा निश्चित भरली जाईल. सध्या जिल्ह्यातील विविध अपंग शाळांमधील काही कर्मचारी मदत करीत असतात.- सचिन साळे, समाजकल्याण अधिकारी, सातारा