शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसह शाळा होणार ‘आयएसओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2015 00:20 IST

कोरेगाव तालुका : २५ शाळांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने पंचायत समितीचे पावले

कोरेगाव : कोरेगाव विकास गटातील ग्रामपंचायत, शाळांना ‘आयएसओ २००१’ मानांकन मिळावे, यादृष्टीने पंचायत समितीच्या पातळीवरून नियोजन करण्यात येत असून, त्यादृष्टीने शैक्षणिक व भौतिक सुविधांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे.पंचायत समितीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरेगाव विकास गटातील शाळा, ग्रामपंचायतींना ‘आयएसओ’ मानांकन मिळाल्यास ग्रामपंचायतीकडील सर्वच योजनांची अंमलबजावणी, देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, दैनंदिन कामकाज, गावांतर्गत स्वच्छता, सर्व कार्यालयाची स्वच्छता यामध्ये गुणवत्ता व सातत्य राखणे शक्य होणार आहे.कोरेगाव विकास गटातील ग्रामपंचायतींनी यापूर्वी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, निर्मल ग्राम योजना, महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी ग्रामीण दलित वस्ती सुधार वस्ती, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, करवसुली, स्वच्छ भारत अभियान, संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान आदी योजनेमध्ये कामकाज करून तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायत व शाळांना हे मानांकन प्राप्त करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात येणार आहे. ‘आयएसओ’ मानांकनांसाठी कोरेगाव पंचायत समितीत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत संभाव्य ६२ गावांतील सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी परिजात संस्था औरंगाबादचे मुख्य व्यवस्थापक प्रसाद जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतींनी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याची माहिती देण्यात आली. त्याच दिवशी संस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रसाद जोशी यांनी त्रिपुटी व शिरंबे ग्रामपंचायतीस भेट देऊन केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यशाळेत सोनके, शिरंबे, भंडारमाची, गुजरवाडी ट., वाठार किरोली, जांब बुद्रुक, जरेवाडी, त्रिपुटी, चिमणगाव, वडाचीवाडी येथील सरपंचांनी कोणत्याही परिस्थितीत गावाचा दर्जा वाढविण्याचा संकल्प केला. अर्चना वाघमळे, प्रभारी गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अभिजित चव्हाण, सचिव राहुल कदम, सदस्य विक्रम देशमुख यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात प्रथम कोरेगाव विकास गटातील २५ अंगणवाड्या २०१४-१५ मध्ये ‘आयएसओ २००१’ मानांकित झाल्या आहेत. आता २५ जिल्हा परिषद शाळांना हा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- संभाजी जंगम, गटशिक्षणाधिकारी