शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विष कालवणाऱ्यांची साहित्यातून बखोटी पकडा!

By admin | Updated: January 3, 2016 00:49 IST

हेमंत देसाई : साहित्यिकांनी समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी लिहितं राहावं

सातारा : ‘अनेक माध्यमांतून अंधश्रद्धेचा प्रचार सुुरू असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलेले बलिदान वाया जाईल, अशी भीती निर्माण होत आहे. या खुज्या भूमिकेला खतपाणी घालण्याची प्रवृत्ती शिवाजी-संभाजींचे नाव घेऊन समाजात विष कालवत आहे. दादागिरी, दहशतीचं वातावरण निर्माण करू पाहणाऱ्यांची साहित्याच्या माध्यमातून बखोटी पकडण्याचं काम फूल आणि पानामध्ये रमलेल्या साहित्यिकांनी करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार हेमंत देसाई यांनी येथे केले. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरीत ग्रंथमहोत्सवामध्ये आयोजित केलेल्या ‘सामाजिक सलोखा व साहित्यिकांचा सहभाग’ या विषयावर आयोजित परिसंवादात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या परिसंवादामध्ये विचारवंत प्रा. डॉ. कन्हैया कुंदप, ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा, प्रा. अनिल बोधे यांनी सहभाग घेतला. सामाजिक सलोखा राखण्याच्या हेतूने प्रत्येक समस्येला भिडण्यासाठी साहित्यिकांनी जाणीवपूर्वक पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर या परिसंवादातून निघाला. देसाई म्हणाले, ‘साहित्यिक मंडळींनी स्तुतिपाठकांच्या संप्रदायामधून बाहेर पडून समाजाकडे एका सम्यक नजरेतून पाहावे, असे आवाहन करतानाच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडण्यासाठी वाद घालणारे साहित्यिक विषमता दूर करण्यासाठी पुढे येत नाहीत,’ अशी जहरी टीका हेमंत देसाई यांनी आपल्या विवेचनात केली. ‘सामान्यांचे शोषण थांबवून त्यांना सन्मान मिळविण्यासाठी लेखन करण्याबरोबरच भांडणे लावणाऱ्या एका विशिष्ट प्रवृत्तीला साहित्यामधून अद्दल घडविण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न केले पाहिजेत,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रा. अनिल बोधे म्हणाले, ‘चांगलं साहित्य निर्माण करून समाजात सलोखा निर्माण करण्याचं काम साहित्यिकांचं आहे. ज्यांना सामाजिक भान आहे, अशीच मंडळी चांगले साहित्यिक होऊ शकतात. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यातून समाजातील प्रश्न मांडले गेले, आता तसे होताना दिसत नाही. साहित्यकृती निर्माण करून थांबण्यात धन्यता न मानता साहित्यिकांनी सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी व्हायला हवे.’ प्रा. डॉ. कन्हैया कुंदप यांनी सामाजिक सलोख्यासाठी महानुभाव साहित्याने दिलेले योगदान साहित्यप्रेमींपुढे मांडले. राजकारण आणि साहित्य या दोन गोष्टी सोबत घेऊन जात असताना दोन्हीमध्ये कधीही गफलत न करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या अभ्यासपूर्ण उत्तराची मांडणीही त्यांनी केली. शंकर सारडा यांनी सामाजिक प्रश्नांना भिडण्याची क्षमता साहित्यात नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘जे. कृष्णमूर्ती यांची प्रवचने महाविद्यालयात शिकत असताना मी ऐकली. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील प्रश्नांसारखेच वर्षानुवर्षे भिजत पडलेले अनेक प्रश्न ठरवलं तर चुटकीसरशी सोडविण्यासारखे आहेत. मी या प्रश्नांची उत्तरे साहित्यातून सोडविण्याचा गेल्या साठ वर्षांत प्रयत्न केला; पण वयाच्या ८० व्या वर्षीही मला ती सापडली नाहीत. भाऊबंदकी, वाद, ईर्ष्या, संघर्ष या बाबी आपल्या समाजात कायम आहेत, साहित्यातून ही मांडली गेली; पण त्याची उत्तरे शोधक पद्धतीने मांडली गेली नाहीत, याचीच मला खंत आहे.’ ग्रंथमहोत्सवाचे कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी परिसंवादात संवादक म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी) मोदींच्या सुरक्षेची काळजी सबनिसांना कशाला? अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पाक भेटीदरम्यान सुरक्षेविषयी काळजी व्यक्त केली होती. वास्तविक मोदींची काळजी घेण्यासाठी शासनाकडे स्वतंत्र खाती आहेत. सबनीस यांनी साहित्याची काळजी घ्यावी, अशी शालजोडी हेमंत देसाई यांनी आपल्या विवेचनातून मारली.