शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जनतेच्या करातून शिक्षणासाठी दिला जाणारा निधी--विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 20:35 IST

सातारा : ‘शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आपला पती शहीद झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तडफ दाखवितात. आणि सैन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट होतात.

ठळक मुद्देराज्यातील पुढची पिढी घडविण्याची गुंतवणूक असल्याचे केले प्रतिपादनशिक्षणमंत्र्यांनी या दोन्ही बोर्डांचा पॅटर्न आपल्यापेक्षा कसा वेगळा असून, आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास कसा करतो?

सातारा : ‘शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आपला पती शहीद झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तडफ दाखवितात. आणि सैन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट होतात. त्या स्वाती महाडिकांचा उभ्या महाराष्ट्राला अभिमान असून, खरेतर त्यांच्या दोन्ही मुलांना तुम्ही विद्यार्थ्यांनी अभिनंदनाचं पत्र आपण होऊन पाठवायला हवे,’ असे उद्गार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढले.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पतंगराव कदम, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत,भाजपचेजिल्हाध्यक्षविक्रमपावसकरउपस्थित होते.

‘राज्यातील कराच्या रूपातून मिळणाºया प्रत्येकी २ रुपये ४० पैशांपैकी ५७ पैसे आपण राज्यातील शिक्षणासाठी देतो. हा निधी म्हणजे खर्च नसून गुंतवणूक आहे,’ असे सांगून विनोद तावडे म्हणाले, ‘ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवत्ता एकाच मापात मोजता येणार नाही. त्यासाठी आपली परीक्षापद्धती जी घोकंपट्टीवर आधारलेली आहे. ती बदलावी लागणार असल्याचे सांगून शिक्षणमंत्र्यांनी काही उदाहरणे देऊन हे पटवून दिले. आता महाराष्ट्रातील शिक्षणात ते बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची वाटचाल विषद केली. रयतच्या भविष्यातील योजना सांगितल्या तर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी किती पराकोटीचे प्रयत्न केले, हे उदाहरण देऊन सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. पतंगराव कदम यांनी रयत शिक्षण संस्थेमुळे बहुजनांची मुलं कशी शिकली. ज्या काळात ज्या शिक्षणाची गरज होती. ते शिक्षण कर्मवीरांनी दिल्याचे सांगून शिक्षणमंत्र्यांच्या कामाचे कौतुकही केले.या कार्यक्रमाच्यापूर्वी शिक्षणमंत्र्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे पहिले शाहू बोर्डींग सुरू केले, त्याची पाहणी केली. त्यांनतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणमंत्र्यांची उत्तरेशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भाषणाच्या नंतर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायची मुभा दिली. ते मंचावरून खाली उतरून विद्यार्थ्यांमध्ये आले. विद्यार्थ्यांनी मनसोक्त प्रश्न विचारले. शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांना त्यांचे समाधान होईल, अशी उत्तरे दिली. आरती पाटील या विद्यार्थिनीने एसएससीमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि सीबीएसई व आयएससीई विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत का फरक पडतो? हे विचारले असता त्यावर शिक्षणमंत्र्यांनी या दोन्ही बोर्डांचा पॅटर्न आपल्यापेक्षा कसा वेगळा असून, आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास कसा करतो? हे सांगितले. त्यात बदल करायची आवश्यकता असून, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.