लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसताना लोकांची आबाळ होऊ नये, याकरिता काहीअंशी शासनाने फक्त अत्यावश्यक सेवेकरिता सूट दिली आहे. त्यातही नियम बंधनकारकच आहेत. सोमवारी अचानकपणे गर्दी झाल्याने पाचगणी पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये ३४ केसेस अंतर्गत २५ हजार ७०० रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली.
पाचगणी पोलीस स्टेशनच्या वतीने आज अशा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये हॉटेल, बंगले, तीन केसेस १५ हजार, सोशल डिस्टन्सिंग ९ केसेस ४ हजार ५००, विनामास्क १६ केसेस ३ हजार २००, एमव्ही ॲक्ट ६ केसेस तीन हजार, अशा एकूण ३४ केसेस अंतर्गत २५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यामध्ये पाचगणी सपोनि. सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार महामूलकर, पोलीस हवालदार माने, महांगडे, पांबरे, बाबर, रसाळ, पो. ना. कांबळे, मुळे, माने, गवळे, शेळके, लोखंडे, जगताप, नेवसे, तसेच होमगार्ड यांनी सहभाग घेतला.