शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक विकासासह शेतकऱ्यांनाही होणार फायदा

By admin | Updated: February 27, 2015 23:16 IST

पुणे-मिरज दुहेरी रेल्वेमार्ग : क्रॉसिंंगची समस्या संपुष्टात येणार

कोरेगाव : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरी करण्याचा निर्णय घेतल्याने सातारा जिल्ह्याचा मोठा विकास होणार आहे. औद्योगिक नगरी म्हणून विकसित होत असलेल्या लोणंदपासून शेणोलीपर्यंत शेतकऱ्यांना आपला शेती माल निर्यात करण्याबरोबरच देशाअंतर्गत मोठ्या शहरांमध्ये पाठविता येणार आहे. रेल्वेच्या सध्याच्या मार्गालगत अगोदरच भूसंपादन झाले असल्याने नव्या मार्गासाठी नव्याने भूमिसंपादन करावे लागणार नाही, त्यामुळे केवळ कामाचा श्रीफळ वाढविण्याच्या प्रतीक्षेत जनता आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला कर्नाटक आणि गोवा या राज्यांना जोडणारा रेल्वेमार्ग सातारा जिल्ह्यातून जातो. हा मार्ग जवळचा असून, त्यावर अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये स्थानके उभारण्यात आली आहेत. गेल्या दहा वर्षांत पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे; मात्र एकेरी मार्गामुळे त्यावर मर्यादा येत होत्या. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या दुहेरी करणाला तत्वत: मान्यता दिल्याने याचा जनतेला मोठा फायदा होणार आहे. साधारणत: १२५ किलोमीटर अंतराचा रेल्वेमार्ग जिल्ह्यातून जातो. रेल्वेने सध्याच्या मार्गालगतच यापूर्वी भूमिसंपादन करून ठेवले आहे. १२५ किलोमीटर अंतरामध्ये साधारणत: ४० किलोमीटर दुहेरी वा तिहेरी मार्ग सध्या आहे. ते स्थानकांच्या परिसरात असून, त्याचा वापर सध्या रेल्वे क्रॉसिंगसाठी केला जात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी नव्या मार्गासाठी खर्च करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)नवीन पुलाची उभारणी गरजेचीजिल्ह्यातून रेल्वे मार्गासाठी कृष्णा नदी मोठी अडसर ठरणार आहे. सातारा, कोरेगाव आणि कराड तालुक्यांतून वाहत असलेली ही नदी सातत्याने रेल्वेमार्गाला आडवी जात असल्याने त्यावर पुलाची उभारणी करणे गरजेचे ठरणार आहे. त्याचबरोबर वसना नदीसह तत्सम छोट्या नद्या आणि ओढ्यांवर पूल उभारणे क्रमप्राप्त ठरणार आहे. शेतीमालाची वाहतूक वाढण्याची शक्यता रेल्वेमार्ग दुहेरी झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक साखर निर्यात होणार असून, कारखान्यांसह खासगी कंपन्या व वाहतूकदारांना रेल्वेचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. माल वाहतुकीबरोबरच प्रवाशांची वर्दळ वाढल्यानंतर स्थानकांवरील उलाढाल देखील वाढणार आहे. क्रॉॅसिंगच्या समस्येला मिळणार पूर्णविरामदुहेरी मार्गामुळे क्रॉसिंगच्या समस्येला पूर्णत: मूठमाती मिळणार असून, सध्याचा रटाळ प्रवास जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. सध्या क्रॉसिंंगचे भूत पॅसेंजरवर बसत असल्याने कोल्हापूर-सातारा आणि सातारा-पुणे या अंतरासाठी तब्बल पाच तास प्रवास करावा लागत आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्या वेळापत्रकाप्रमाणे धावत नसल्याने सायंकाळी व रात्री पॅसेंजरमधून प्रवास करणे जिल्हावासीयांना धोक्याचे वाटत आहे.