शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

सहा महिन्यांच्या तान्हुलीला रस्त्यावर फेकल

By admin | Updated: January 19, 2015 00:21 IST

अज्ञाताचे कृत्य : पोलिसांनी केला शोध सुरू; भरतगाव येथे घडली घटनो

सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावर रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरतगाव येथे कोणीतरी अज्ञाताने सहा महिन्यांची तान्हुली रस्त्यावर फेकून दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. या बालिकेवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, भरतगावचे पोलीस पाटील प्रताप शंकर शेलार यांना रविवारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर एका कडेला सहा महिन्यांच्या तान्हुलीला फेकून दिल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या तान्हुलीचे नातेवाईक आजूबाजूला कोठे आहेत का, याचा शोध घेतला मात्र, त्यांना कोणी आढळून आले नाही. दरम्यान, याची माहिती त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास कदम आणि सहायक फौजदार अशोक हजारे यांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी तान्हुलीला नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, पोलिसांनी कोणताही धोका नको म्हणून तान्हुलीला तत्काळ सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक फौजदार अशोक हजारे करत आहेत. (प्रतिनिधी)