शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जिल्हा बँकेचे मतदार निघाले पर्यटनाला; ‘अर्ज मागे’चा भोपळा

By admin | Updated: April 15, 2015 23:59 IST

--सांगा डीसीसी कोणाची?

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी संघर्ष अटळ असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागल्याने मतदारांना खूश ठेवण्याच्या असंख्य क्लृप्त्या वापरल्या जाऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील वजनदार नेते मंडळींनी आपल्या मतदारांना ‘कन्याकुमारी अन् तिरुपती’सह दक्षिण भारताच्या पर्यटनाला धाडल्याची जोरदार चर्चा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत कऱ्हाड, पाटण, माण व जावळी तालुका सोसायटी मतदारसंघांत संघर्ष अटळ असल्याचे चित्र समोर येत आहे. नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातही जोरदार चढाओढ असून, याठिकाणीही रंगतदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अवघ्या २१ जागांसाठी १२८ उमेदवारांचे २०३ अर्ज छाननीत वैध ठरले असून, अर्ज मागे घेण्याच्या पाचव्या दिवशीसुद्धा एकही अर्ज मागे घेतला गेला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप आठ दिवसांची मुदत असल्याने मिळालेल्या कालावधीत हात ओले करून घेण्याचे प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहेत. ‘इच्छा माझी पुरी करा,’ असाही हेका काही जणांनी लावून धरल्याने निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या ‘वजनदार’ असामींना नाइलाजानं खर्च करून त्यांना पर्यटनाला पाठवावे लागले आहे. जावळी-कोरेगावातील काही मंडळी लांब दौऱ्यावर गेल्याची खबरबात आहे. या दौऱ्यात केवळ अंगावरील कपड्यानिशी यायचे, बाकी सर्व काही आधीच नियोजनबद्ध केलेले आहे, असे सांगण्यात आल्याने पर्यटनाला गेलेल्यांची चांदी झाली आहे. त्यांच्या या दौऱ्याची बातमी समजलेले सामान्य सभासद मात्र त्यांचा हेवा करताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीअंतर्गत सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निवडणूक बिनविरोध करण्याच्या सूचना केल्या आहेत. अर्ज मागे घेतले जातील; मात्र त्यासाठी २२ तारीख उजाडावी लागेल. या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले असले, तरी जास्त जागा बिनविरोध होतील, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)आमदारांवर जबाबदाऱ्याजिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे पक्षाच्या आमदारांवर मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचा आदेश शिरोधार्य मानून आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून, त्या-त्या मतदारसंघात ठिय्या मांडला आहे. ...खंडाळा विश्रामगृहावर अजित पवारांची बैठकसोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने खंडाळा तालुक्यातील दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी विश्रामगृहावर गुप्त बैठक घेऊन जिल्हा बँक बिनविरोध करण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. या बैठकीला रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटीलही उपस्थित होते. जावळीतले ३४ मतदार गायबजावळी विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील ३४ मतदार अचानकपणे गायब झाले आहेत. ही सर्व मंडळी दौऱ्यावर गेल्याची तालुक्यात चर्चा आहे; परंतु नेमक्या कुठल्या पर्यटनस्थळी ही मंडळी गेली आहेत, याचा शोध अनेकजण घेत आहेत.