शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

‘डीसीसी’त माणचा आकडा ‘तीन’!

By admin | Updated: April 17, 2015 00:09 IST

इच्छुकांची मोर्चेबांधणी : इतिहासात प्रथमच अधिक संचालक निवडूण येणार--सांगा डीसीसी कोणाची ?

नितीन काळेल- सातारा -जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाण्यासाठी शेकडो जण इच्छुक असले तरी जिल्ह्यातील २१ जणांनाच संधी मिळणार आहे. या २१ जणांत माण तालुक्यातील किमान तिघेजण तरी असणार, असे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे बँकेच्या इतिहासात प्रथमच माणला अधिक संचालक मिळू शकतात. यामध्ये आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार सदाशिवराव पोळ, मनोजकुमार पोळ, संचालक अनिल देसाई, पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे यापैकी तिघेजण असण्याची शक्यता अधिक आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक दि. ५ मे रोजी होत आहे. २१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत १२८ उमेदवारांचे २०३ अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. अर्ज माघारी घेण्याची मुदत आणखी काही दिवस असताना अनेकांनी जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाण्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे. सत्ताधारी पॅनेलमधील अनेकांनी वरिष्ठापर्यंत धाव घेऊन जिल्हा बँकेत येण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. असे असताना माण तालुक्यातूनही अनेकजण इच्छुक म्हणून पुढे आलेले आहेत. माणमधून सोसायटी मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार व विद्यमान संचालक सदाशिवराव पोळ, पोळ यांचा मुलगा मनोजकुमार पोळ, रामचंद्र माने, युवराज बनगर, संजय जगताप. इतर मागास प्रवर्गातून पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग आणि नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघ (दोन्ही मतदारसंघातून) अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, भटक्या विमुक्त प्रवर्गातून अर्जुन काळे यांचाही अर्ज आहे. औद्योगिक विणकर व मजूर मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य आणि विद्यमान संचालक अनिल देसाई यांचा अर्ज आहे.सोसायटी मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे व विद्यमान संचालक सदाशिवराव पोळ यांच्यात लढत होणार आहे. ऐनवेळी पोळ स्वत:चा अर्ज मागे घेऊन मुलगा मनोजकुमार पोळ यांनाही पुढे आणू शकतात. त्यामुळे आमदार गोरे व पोळ पिता-पुत्रांपैकी कोणीतरी निवडणूक रिंगणात असणार आहे. इतर मागास प्रवर्गातून जिल्ह्यातील अनेकजण इच्छुक असले तरी बँकेतील सत्ताधारी गटाकडून शेखर गोरे यांचाच पर्याय समोर असणार आहे. कारण आमदार गोरेंना थोपवायचे असेल तर शेखर गोरेंसारखा हुकमी एक्का नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना किंवा राष्ट्रवादीला शेखर गोरे यांना थांबविणे परवडणारे नाही. औद्योगिक विणकरमधून अनिल देसाई यांनी यापूर्वी दोनदा बाजी मारली आहे. ते सत्ताधारी गटातील आहेत. यंदाही ते सत्ताधारी गटाकडून रिंगणात असणार हे स्पष्ट आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून अ‍ॅड. भास्करराव गुंडगे व अर्जुन काळे उतरले आहेत. दोघांनाही संधी मिळण्याचे प्रमाण कमी आहे. बँकेसाठी दुसरे पॅनेल तयार झाले तर काळे रिंगणात असण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या इतिहासात आतापर्यंत एकाचवेळी माणमधील दोघांना संचालक होण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये सदाशिवराव पोळ आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. त्यामध्ये यंदा आणखी एका संचालकाची भर पडण्याची अधिक शक्यता आहे.शेखर गोरेंना डावलणे शक्य नाही...माणमध्ये सोसायटी निवडणुका व ठरावांच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेखर गोरे एकत्र होते. त्यामुळे अनेक सोसायटी या दोघांकडे आल्या आहेत. सदाशिवराव पोळ व शेखर गोरे यांनी निवडणुकीत उतरणार, हे पहिल्यापासून सांगितलेच आहे. त्यामुळे सोसायटी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात कोण असणार, असा प्रश्न पडला होता; पण तो आता संपुष्टात आला आहे. पोळ हे सोसायटी तर शेखर गोरे इतर मागास प्रवर्गातून आहेत. शेखर गोरे यांच्याकडे अनेक सोसायट्या आहेत. त्यांची मदत ही पोळ यांना घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे इतर मागास प्रवर्गातून शेखर गोरेंना सहजासहजी डावलणे शक्य नाही. तात्या की मुलगा...माणमधून सोसायटी मतदारसंघातून आमदार गोरे यांच्याबरोबरच सदाशिवराव पोळ, मनोजकुमार पोळ, युवराज बनगर, संजय जगताप आदींचे अर्ज आहेत. शेवटी आमदार गोरे हे निवडणुकीत असणार, हे स्पष्ट आहे. विरोधात माजी आमदार पोळ असू शकतात; पण सध्या पोळ तात्या मुलगा मनोजकुमार पोळ यांना निवडणुकीत उतरवू पाहत आहेत. त्यामुळे सोसायटी मतदारसंघात आमदार गोरे यांची लढत ही पोळ पिता-पुत्रांपैकी एकाशीच होऊ शकते.