शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्यतेने यारी चालविणाऱ्या धाडसी रणरागिणी!

By admin | Updated: September 10, 2016 00:40 IST

बेलमाचीच्या आम्ही चौघी : पुरुषांइतकाच रोजगार देऊन बुलंद केला महिला समानतेचा नारा

भुर्इंज : धडधडणाऱ्या याऱ्या... खोलवर गेलेल्या बकेटमध्ये दगड, मुरूम, माती किंवा गाळ भरला की सराईतपणे गियर टाकायचा, लिव्हरवर दाब देतानाच ब्रेकवरदेखील नियंत्रण ठेवायचे. बकेटवर उचलून पुन्हा सारी यारी उलट्या दिशेला फिरवून बकेट रीती करायची. यात थोडीजरी चूक झाली तरी दोर तुटून बकेट खाली कोसळणार आणि उभ्या असलेल्या मजुरांच्या जीवाशी खेळ होणार, असे हे धोकादायक काम. हे काम अत्यंत कौशल्यतेने बेलमाचीच्या सुनिता बोडरे सवंड्यांबरोबर करत आहेत.महिला आता पायलट झाल्या आहेत, दुचाकीपासून ट्रॅक्टरटरपर्यंत सारी वाहनं चालवू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे आता उपेक्षित समाजातील महिला दोन वेळच्या अन्नासाठी वाहन चालवण्यापेक्षाही कठीण आणि धोकादायक असलेल्या यारी चालवण्याचे काम करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे हे काम करणाऱ्या महिलांना हे शिक्षण कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये मिळाले नाही किंवा यातील अनेकांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही. तरीदेखील केवळ आत्मविश्वासाच्या आणि जन्मजात अंगी असलेल्या उर्मीच्या बळावर महिलांनी हे काम आत्मसात केले आहे. एका दिवसात सुमारे १० ब्रास मुरूम, माती, दगड, गाळ काढण्याचे काम एका यारीच्या साह्याने होते. एका यारीसोबत सहा मजूर राबतात. या सर्वांमध्ये सर्वात कसबीचे काम हे यारी चालवण्याचे असते. काही काही ठिकाणी तर हे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या घरी असणाऱ्या या याऱ्या चालवण्यास लहान वयातच त्या घरातील काही तरुणी शिकल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कामातून एवढा आत्मविश्वास निर्माण केला आहे की, पुरुषांपेक्षा आता त्यांच्यावरच या धोकादायक कामाची जबाबदारी निर्धास्तपणे सोपवली. संधी मिळाली, की स्वत:ला सिद्ध करणाऱ्या महिलांनी जगण्यासाठी शोधलेली ही संधी यशस्वी केली आहे. (प्रतिनिधी)यारी चालक ते ठेकेदार... वाई तालुक्यातील बेलमाची गावच्या सुजाता बोडरे या महिला स्वत: यारी चालवतातच शिवाय आता या कामातील ठेकेदार म्हणून सर्वपरिचित आहेत. त्या म्हणाल्या, ‘चारचाकी गाडी चालवणं खूप सोपं; पण ही यारी चालवणं अवघड! जरा कुठं इकडं तिकडं झालं तर एक-दोन माणसांच्या जीवावर बेतलंच समजा. त्यामुळं फार धोक्याचं काम आहे हे. आम्ही बायका आता या याऱ्या चालवतो पोटाच्या भुकेने या कामाकडं आम्हाला वळवलं आहे. डोक्यावर दगड-धोंडी वाहायची म्हणून पुरुषांच्या बरोबरीने असे काम करायला सुरुवात केली. इतर रोजगाराच्या कामात बाईला पुरुषांपेक्षा कमी रोजगार मिळतो. मात्र या कामात बाईला आणि पुरुषाला मात्र बरोबरीचा रोजगार आहे. यावरून या कामाचं मोल कळलं. पुरुष मंडळी थोडा वेळ तरी इकडं तिकडं घालवतील; पण आम्हा बायकांचं तसं नाही. एकदा सकाळी कामाला सुरुवात केली की थेट दुपारी जेवायलाच सुटी आणि त्यानंतर दिवस सरल्यावर दिवसाचीच सुटी. या आत्मविश्वासावरच आता मी स्वत: ठेकेदार झाले. माझी स्वत:ची क्रेन आणि १२ मजूर माझ्याकडे काम करतात. त्यामध्ये ४ महिला असून, त्यांना आणि गड्यांना एकसारखाच रोजगार आहे.’पहिल्यांदाच झाल्या कौतुकाच्या धनीकिसन वीर कारखान्यावर नुकतेच गाळ काढण्याचे काम करताना आठ याऱ्या वापरल्या गेल्या. विशेष म्हणजे या आठही याऱ्यांवर चालक म्हणून महिलांनीच काम केले. त्याची चर्चाही झाली. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी आवर्जून कामाच्या ठिकाणी जाऊन या महिलांच्या कामाची दखल घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले. घरात कारभारीण असणाऱ्या महिला जगण्याची लढाई लढताना घरातील साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडून पुन्हा या पुरुषांच्या कामामध्ये पुरुषांना मागे टाकून या कामाच्याही कारभारी झाल्या. मात्र, त्यांची दखल या ठिकाणी पहिल्यांदाच घेतली जाऊन त्या कौतुकाच्या धनी झाल्या. यावेळी संचालक पै. मधुकर शिंदे, नवनाथ केंजळे, शेखर भोसले-पाटील, विराज शिंदे, संदेश देशमुख, संजय भोसले, नितीश शिंदे, जालिंदर भोसले आदी उपस्थित होते.