वरकुटे-मलवडी : ‘ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देवापुरातील युवकांनी सुरू केलेली सामाजिक चळवळ गौरवास्पद असून, गाव स्वच्छतेसाठी राबवलेले सर्व उपक्रम अनेक ग्रामपंचायतींना दिशादर्शक ठरतील. देवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे,’ असे मत कुकुडवाड जिल्हा परिषदेच्या सदस्या सुवर्णा देसाई यांनी व्यक्त केले.
देवापूर (ता. माण) येथे कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुवर्णा अरुण देसाई यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमी शेड मंजूर करण्यात आले. त्याचे भूमिपूजन वरकुटे मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. आणि जिल्हा परिषद शाळेला शेष फंडातून एलईडी भेट दिला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई, माजी उपसरपंच किरण बाबर, राजाराम बाबर, जालिंदर खरात, जयसिंग नरळे, सतीश जगताप, भारत अनुसे, रावसाहेब बाबर, मदन बाबर, बाळासाहेब बाबर, शिवाजी बाबर, कृष्णराव बाबर,ूमधुकर जगताप, वस्ताज ढेरे, अविनाश मासाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
देसाई म्हणाल्या, ‘देवापूर येथील अंतर्गत रस्त्यासाठी भरघोस निधी देण्यात येणार असून, जिल्हा परिषद शाळेस तीन वर्गखोल्यांची दुरुस्ती, एक डिजिटल रूम, पाच संगणक व वॉल कंपाऊंड करून देणार आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१०वरकुटे मलवडी
देवापूर (ता. माण) स्मशानभूमीच्या शेडचे भूमिपूजन करताना सरपंच बाळकृष्ण जगताप, सुवर्णा देसाई, अनिल देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.