शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेत पक्षी, फुलपाखरे बागडली...

By admin | Updated: January 19, 2015 00:25 IST

सातारा : स्पर्धेत २२०० विद्यार्थ्यांचा सहभाग

सातारा : कडाक्याची थंडी... धुक्यात हरवलेली सकाळ... सभोवताली उंचच उंच डोंगर असणाऱ्या येथील भैरोबाच्या डोंगराच्या पायथ्याशी सकाळी सातपासून चिमुकल्यांची वर्दळ सुरू झाली. प्रचंड उत्साहात हे चिमुकले रंगांच्या चित्रांच्या दुनियेत हरवून गेले. कोणी फुगेवाला रेखाटला तर कुणी जोकर, फुलदाणी, आवडता पक्षी, बागडणारी फुलपाखरे तर पाण्यात नाव सोडणारी स्वच्छंदी मुले, काहीजणांनी कागदावर अक्षरश: जिवंत केली. निमित्त होते. ‘रोटरॅक्ट क्लब आॅफ सातारा कॅम्प’ आयोजित ‘इंद्रधनुष्य २०१५’ या भव्य चित्रकला स्पर्धेचे. सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत प्ले-ग्रुप पासून ६ वी पर्यंतच्या २२३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी रोटरीचे प्रांतपाल रो. व्यंकटेश मेतन, सेक्रेटरी रो. श्रीराम कुलकर्णी, दिग्दर्शक समृद्धी जाधव, शिल्पकार विकास सावंत, कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजय धुमाळ, चित्रकार क्षीरसागर, अमोल वाघमोडे, विजय पाटील, संतोष शेडगे, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष रोटरॅक्टर नरेंद्र शेलार, प्रकल्प प्रमुख रोटरॅक्टर सतीश डोके, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. सुहास शहाणे, रो. संदीप सुतार हे उपस्थित होते.या स्पर्धेसाठी आनंदबन शाळेचा शिक्षक वर्ग, कर्मनिष्ठा सामाजिक संस्था यांचे सहकार्य मिळाले.या स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन २६ जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत येथील शाहू कला मंदिर या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रोटरॅक्टर नरेंद्र शेलार यांनी केले. (प्रतिनिधी)