शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

सभापती व्हायचे होते; झाल्या आरोपी!

By admin | Updated: September 18, 2014 23:26 IST

बोगस जात प्रमाणपत्र : पाटण पंचायत समिती सदस्या सुमन जाधवांवर गुन्हा

पाटण : नुकत्याच झालेल्या सभापती निवडीत देसाई गटाच्या पंचायत समिती सदस्या सुमन जाधव यांनी ओबीसी (कुणबी) जातीचे बोगस प्रमाणपत्र दाखविल्याबाबत पाटणकर गटाच्या विद्यमान सभापती संगीता गुरव यांनी पाटण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ठकबाजी करून खोटी सही व शिक्क्याचा वापर केल्याप्रकरणी सुमन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. -पाटणकर गटाचे पंचायत समितीचे सदस्य राजेश पवार यांनी या बनावट जात प्रमाणपत्राचा पाठपुरावा करताना कोल्हापूर येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केला होता. या अर्जाला उत्तर देताना विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्राच्या सदस्य सचिवांनी / राजेश पवार यांना कळविले की, ‘८५०८०४’ या क्रमांकाचे वैधता जात प्रमाणपत्र संगणकीय माहितीनुसार फैजअहमद मुबारक मुलाणी या अर्जदारास निर्गमित केले आहे. मात्र, मारुल हवेली गणाच्या पंचायत समिती सदस्या सुमन श्रीमंत जाधव (रा. दिवशी बुद्रुक, ता. पाटण) यांच्याकडील त्याच क्रमांकाचे प्रमाणपत्र बनावट असून, त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकडे केलेला अर्ज परिपूर्ण नसल्याने तो स्वीकारलेला नाही. त्यानुसार सुमन जाधव यांच्याविरोधात सभापती संगीता गुरव यांनी फिर्याद दिली. काल, बुधवारी रात्री त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड तपास करीत आहेत. दरम्यान, ‘सत्तेसाठी देसाई गट कोणत्याही थराला जाऊ शकतो. आताचे हे जिवंत उदाहरण असून, संघटितपणे केलेल्या या प्रकाराचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करावी,’ अशी मागणी सभापती गुरव यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ‘बोगस प्रमाणपत्र सादर करून काही राजकीय मंडळींनी ओबीसी वर्गाची प्रतारणा केली आहे,’ असे आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी म्हटले आहे. चिठ्ठीवर झाली होती निवड !पाटण पंचायत समितीचे सभापतिपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यानुसार पाटणकर गटाकडे संगीता गुरव आणि मिलन सय्यद या दोन महिला सदस्या होत्या; तर देसाई गटाकडे ओबीसी आरक्षणातील एकही महिला सदस्या नव्हती. तरीही सर्वसाधारण प्रवर्गातील सुमन जाधव यांनी बोगस जात प्रमाणपत्र मिळवून सभापतिपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, नशिबाने चिठ्ठीवर झालेल्या निवडीत पाटणकर गटाच्या गुरव या सभापती झाल्या होत्या.