शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा, साताऱ्यात जरा जपूनच!

By admin | Updated: August 27, 2014 23:30 IST

उपरस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे : तात्पुरती ‘मुरुमपट्टी’ केलेल्या रस्त्यांवर पावसामुळे चिखलाचे ‘विघ्न’

सातारा : विघ्नहर्त्याच्या उत्सवात यावर्षीही खड्ड्यांचे विघ्न ‘आ’ वासून उभे राहिले आहे. शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले असले, तरी अंतर्गत भागात अत्यंत वाईट स्थिती आहे. अशा भागातील अनेक मंडळांना मूर्ती आणतानाही बरीच कसरत करावी लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे ‘बाप्पा, यंदा जरा जपूनच या’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम नेमके केव्हा संपणार, या प्रश्नाचे उत्तर शोधणे सातारकरांनी आता सोडून दिले आहे. दरवर्षी मे महिन्याची ‘डेडलाइन’, पालिका आणि प्राधिकरणात कलगी-तुरा, ठेकेदाराला दिले जाणारे इशारे हे सर्व ‘उपचार’ गेल्या तीन वर्षांपासून उन्हाळ्या-पावसाळ्याइतकेच ‘नियमित’ झाले आहेत. हा ‘नियमितपणा’ कायम राखून यावर्षीही ‘डेडलाइन’ पाळली गेली नाही, तेव्हा पावसाळ्यालाच सातारकरांची कीव येऊन तो थोडा ‘अनियमित’ झाला आणि पालिकेला रस्ते करण्यासाठी अधिक वेळ मिळाला. थोड्या काळात जास्त रस्ते करण्याचा विडा पालिकेने उचलला खरा; पण त्याच वेळी काही ठिकाणी काम उरकले जात असल्याचा आरोप करून कामे बंद पाडण्याचा ‘राजकीय ऋतू’ अवतरला. इशारे-प्रतिइशाऱ्यांचा ‘पाऊस’ पडला. ‘कामे रोखणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू,’ असा दम संबंधितांना भरून पालिकेने ‘यादी’वरचे रस्ते पूर्ण केलेच. परंतु यादीबाहेर अजून बराच सातारा शिल्लक आहे आणि बाप्पांना तर प्रत्येक पेठेत जायचे आहे. जीवन प्राधिकरणासोबत बाप्पांची वाट खडतर करणाऱ्यांमध्ये अनेक घटक आहेत. कधी भुयारी वीजवाहिन्यांसाठी, तर कधी टेलिफोनच्या केबलसाठी रस्ते वारंवार उकरले गेले. भरपावसात रस्ते ‘करता’ येत नसले तरी ‘उकरता’ येतात, हे वेगवेगळ्या कारणांनी सातारकरांसमोर सिद्ध करून दाखविण्यात आले. परवा-परवापर्यंत अनेक ठिकाणी खोदकाम सुरूच होते. त्यातच वीस आॅगस्टचा ढगफुटीसदृश पाऊस झाला आणि नव्याकोऱ्या रस्त्यावरही डोंगरावरून मुरूम, माती वाहून आली. बिकट उपरस्ते आणखी खडतर झाले. नव्याने खोदकाम केलेल्या ठिकाणी तर दाणादाण उडाली. थोडी उघडीप मिळताच तात्पुरत्या ‘मुरुमपट्टी’ला वेग आला. काही रस्त्यांवर मोठे डबर आणून ठेवण्यात आले आहे. हातफोडीची खडी वापरून रस्ते करण्याचे हे नियोजन असले, तरी सध्या या ढिगाऱ्यांचा अडथळाच होणार आहे. त्यातच पाऊस आला तर कार्यकर्त्यांची तारांबळ उडू शकते. निसर्गाचा नुकताच पाहिलेला प्रकोप आणि रस्त्यांची अवस्था विचारात घेऊनच मंडळांना नियोजन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)रस्त्यांवरचे खड्डे, कर्णकर्कश वाद्ये आणि डॉल्बी, किळसवाणी बीभत्स नृत्ये अशा वातावरणात ‘मी पृथ्वीवर राहायला कसा येऊ,’ असा सवाल गणपतीबाप्पा करीत आहेत... ही संकल्पना गुरुजींनी कवितेत उतरविली. त्यांच्या शाळेतल्याच एका मॅडमनी त्यावर आधारित एक छानसं चित्रही काढलं. संकल्पना सगळ्यांनाच आवडली आणि पाहता-पाहता तिचा विस्तार झाला. या संकल्पनेतून तब्बल सहा हजार पत्रकं तयार झाली आणि प्रबोधनाच्या हेतूनं शाळांमध्ये पोहोचली. गुरुकुल स्कूलमधील पर्यवेक्षक मोहन बेदरकर यांच्या या कवितेवर सोनाली काटकर या कलाशिक्षिकेने चित्र काढलं आहे. त्याचंच रूपांतर पत्रकात झालं आणि बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून सहा हजार प्रती काढण्यात आल्या. ही पत्रकं अनंत इंग्लिश स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, गुरुकुल स्कूल याबरोबरच कोरेगावच्या शाळेतही वितरित झाली आहेत. मुलांच्या माध्यमातून ती घरोघर पोहोचावीत आणि बाप्पाचं पावित्र्य राखण्याचा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संकल्प घरोघरी करण्यात यावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.