शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

बाबाराजे म्हणाले,‘ हवं तर माझे कान धरा!’

By admin | Updated: October 27, 2014 23:44 IST

‘दगड’ विधान मागे : जनतेवर नव्हे तर निवडणुकीत खेळी करणाऱ्यांवर नाराज

सातारा : ‘शहरात मला अपेक्षित मतदान पडले नाही, त्याचे आत्मपरीक्षण आम्ही केले आहे. याबाबत कोणालाही दोष देत बसणार नाही. नागरिकांनी मतपेटीच्या माध्यमातून माझा कान पकडला. हेच काम करताना त्यांनी निवडणूक येईपर्यंत वाट पाहू नये. सातारकरांना माझ्याकडून संयमाची अपेक्षा आहेत. तो मी राखणार आहे. लोकांनी निवडणुकीआधी हवे तर माझा कान पकडावा,’ अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली भावना पत्रकार परिषदेत व्यक्त केली.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नाराज होत ‘माझे हात दगडाखाली होते, आता दगड माझ्या हातात आहे.’ अशा शब्दात ही नाराजी व्यक्त केली होती. हे विधान मागे घेत त्यांनी आज ‘माझ्याकडून काम करताना चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी मला संधी द्या,’ अशी विनंती जनतेला केली.दरम्यान, खेळ्या करणाऱ्यांना पालिका निवडणुकीत जागा दाखविणार का? या प्रश्नाबाबत त्यांनी निवडणुकीआधी सगळेच समजेल, असेही सूचकपणे सांगितले. नगरपालिकेचे कामकाज करताना माझ्या एकट्याची सत्ता तिथे नाही. दोन्ही आघाड्यांना विश्वासात घेऊन कामे करावी, लागतात, असे सांगत त्यांनी आपला रोष सातारा विकास आघाडीवरही असल्याची जाणीव करुन दिली. आमदार भोसले म्हणाले, ‘काही समस्या राहिल्यानेच लोक नाराज होते. त्यांना माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी त्यांच्यातलाच एक आहे. निवडणूक निकालानंतर मी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती व्यक्त करायला नको होती, अशा भावना माझ्याजवळ अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. सातारा शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. येथील बोगदा परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या इमारतींची बांधकामे सुरू आहेत. याठिकाणी काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून व्यावसायिक आणि झोपडपट्टीवासीयांना दमदाटी करून हप्ता वसुली, खंडणी मागण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा समाजविघातक गुंडप्रवृत्तींची दहशत मोडीत काढून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलावीत.बोगदा परिसरात काही गुंड आणि गुन्हेगारांनी नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू केले आहेत. यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही समावेश आहे. दहशत माजवून झोपडपट्टीवासीयांसह छोटे-मोठे व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिकांना धमकावणे, मारहाण करून त्यांच्याकडे खंडणी, हप्त्याची मागणी करणे, अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अशा लोकांच्या कारवायांना प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. पोलीस कारवाई करण्याऐवजी राजकीय दबावाचे कारण पुढे करून अशा गुंडांना अभय देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. भीतीपोटी नागरिक अशा गुंडांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. पोलीस मात्र तक्रार नसल्याचे कारण पुढे करत कारवाई करण्याचे टाळतात.’ (प्रतिनिधी)बोगद्यातील गुंडांचा बंदोबस्त कराबोगदा परिसरातील गुंडगिरीविरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही दंड थोपटले आहेत. दमदाटी, हप्ता वसुली, खंडणीखोरांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या मतदार संघामध्ये असणाऱ्या गुंडगिरीविरोधात रणशिंग फुंकले होते. यानंतर लगेचच शिवेंद्रराजेही गुन्हेगारीविरोधात आक्रमक झाल्याचे दिसले.‘नागरिकांची सुरक्षा आमच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे अशा गुंड आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना कोणीही पाठीशी घालणार नाही, याची जाणीव ठेवून पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करावी,’ असेही ते म्हणाले.