शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पुसेगाव कोविड सेंटरला चोवीस तास अखंडित वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST

पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ४२ गावांतील कोरोना रुग्णांसाठी पुसेगाव येथे सुरू असलेले कोविड सेंटर ...

पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ४२ गावांतील कोरोना रुग्णांसाठी पुसेगाव येथे सुरू असलेले कोविड सेंटर समस्यांच्या जाळ्यात अडकले होते. वीज वितरण कंपनीच्या सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे व्हेंटिलेटरवरील, तसेच ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागत होता. या बाबींची आमदार शशिकांत शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेत, पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी २० केव्ही क्षमतेचा जनरेटर स्वखर्चातून भेट दिला.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सरपंच विजय मसणे, तलाठी गणेश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, प्रवीण देवकर, ज्ञानेश्वर कुंभार आदी उपस्थित होते.

येथील कोविड केअर सेंटरमध्ये ७० रुग्णांची उपचारासाठी क्षमता आहे. दरम्यान, श्वसनाचा त्रास असलेल्या काही कोरोनाबाधित रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते, तर गंभीर स्थितीत असलेल्या काही रुग्णांना कृत्रिम ऑक्‍सिजन पुरवावा लागतो. तशी व्यवस्थाही या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. मात्र, येथे जनरेटरची सोय नसल्याने वीजपुरवठा खंडित होऊन उपचार आवश्‍यक असलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या जिवाशी खेळ होत असल्याच्या घटना घडत होत्या. तसेच रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास कोविड सेंटरमधील रुग्णांना अंधारासोबतच उकाड्याचा त्रास देखील सहन करावा लागत होता. मात्र, आता आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वखर्चातून हा जनरेटर दिल्याने येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कोट..

गतवर्षी या भागातील प्राथमिक शिक्षकांनी या आरोग्य केंद्राला कॉन्सनट्रेटेड ऑक्सिजन मशीन भेट दिल्या होत्या. त्याच्या मदतीने आतापर्यंत उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास रुग्णालय प्रशासनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. आरोग्य केंद्रास जनरेटर उपलब्ध केल्याने तातडीने उपचार आवश्‍यक असलेल्या रुग्णांची आता गैरसोय टळणार आहे.

- डॉ. आदित्य गुजर, वैद्यकीय अधिकारी, पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र

कोट..

काही तांत्रिक अडचणीमुळे येथील वीजपुरवठा खंडित होऊन केवळ जनरेटरअभावी कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फार हाल होत होते. आ. शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी जनरेटरची सोय केल्याने आरोग्य विभागासोबतच परिसरातील रुग्णांची काळजी मिटली आहे.

- गणेश बोबडे, तलाठी

०२पुसेगाव

पुसेगाव (ता. खटाव) पुसेगाव कोविड सेंटर येथे कायमस्वरूपी जनरेटरची सोय करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, गणेश जाधव, तलाठी बोबडे व इतर. (छाया : केशव जाधव)