पाटण : कोयना धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसाने गेल्या दहा दिवसांपासून विश्रांत घेतली आहे. तरीसुद्धा कोयना धरण अपेक्षेप्रमाणे तुडुंब भरल्यामुळे वर्षभराची चिंता मिटली आहे. धरणात १०४.४९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे धरणातील पाण्यावर दररोज वीजनिर्मिती केली जात आहे.१०५.२५ टीएमसी पाणीक्षमतेचे कोयना धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले. यापुढेही काही दिवसांत परतीचा पाऊस होण्याची चिन्हे आहेत. सध्या कोयना धरणाच्या धरणातून अथवा पायथा वीजगृहातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. मात्र, पश्चिमेकडील कोळकेवाडी येथील वीजनिर्मितीची केंद्रे आणि चौथ्या टप्प्याकडे पाणी पुरविण्यात येत आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवकेच्या प्रमाणात वीजनिर्मिती प्रतिसेकंद इतका आहे. धरणातील पाणी उंची २१६२ फूट इतकी आहे. ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी आणि ३० टीएमसी पाणी सिंचन पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते. (प्रतिनिधी)
कोयनेत १०४.८९ टीएमसी पाणीसाठा
By admin | Updated: September 21, 2014 00:29 IST